

अलिबाग ः नवरात्रौत्सवाचे वेध सर्वार्ंनाच लागलेले आहेत. सोमवारी ( 22 सप्टेंबर) पासून सुरु होणार्या या उत्सवाची सर्वस्तरातून जोरदार तयारी सुरू झालेली आहे.याचे औचित्य साधत दै.‘पुढारी’नेही नवरात्रोत्सवानिमित्त्त नऊ रंगांचा उत्सव आयोजित केला आहे.यासाठी ‘पुढारी’च्या महिला वाचकांना प्रसिद्धीची संधी मिळणार आहे.याचा लाभ घ्यावा,असे आवाहन ‘पुढारी’ परिवारातर्फे करण्यात आलेे आहे.
हिंदू संस्कृतीत शारदीय नवरात्रौत्सवाचे अनन्यसाधारण असे महत्व आहे.गेल्या काही वर्षात गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रीचे महत्व कमालीचे वाढले आहे.विविध सामाजिक संस्था,सार्वजनिक मंडळांतर्फे महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी नवरात्रात विविध उपक्रम आयोजित केले जातात.नारीशक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी नऊ रंगांचा हा उत्सव रायगड जिल्ह्यात ‘पुढारी’तर्फे आयोजित केला आहे.
यामध्ये नवरात्रातील पहिल्या दिवसांपासून नवरात्र संपेपर्यंत नऊ दिवस विविध क्षेत्रातील महिलांचे ‘पुढारी’च्या पहिल्या पानावर त्या दिवसाच्या रंगांच्या साडीसह आकर्षक वेशभूषा केलेला सुंदर फोटो प्रकाशित केला जाणार आहे.त्या बरोबरच संबंधित महिलेची थोडक्यात माहितीही प्रसिद्ध केली जाणार आहे.जेणेकरुन महिलांना प्रोत्साहन देण्याचा ‘पुढारी’परिवाराचा प्रयत्न राहणार आहे.याचा लाभ महिलांनी घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहेत.
महिलांच्या सामुहिक फोटोंना प्रसिद्धी
नवरात्रौत्सवाचे औचित्य साधत पुढारीने शासकीय,खासगी आस्थापना, बँका, पतसंस्था, शाळा, महाविद्यालये,बचतगट आदी ठिकाणी कार्यरत असलेल्या महिलांचे नऊ दिवसातील सामूहिक फोटो प्रसिद्ध केले जाणार आहे.यासाठी पशुी.रश्रळलरसर्ऽिीवहरीळ.ले.ळप येथे आपले फोटो दुपारी 12 वाजेपर्यंत संपूर्ण माहितीसह पाठवावेत.
नवरात्रीचे नऊ रंग
22 सप्टेंबर -पहिली माळ - पांढरा
23 सप्टेंबर - दुसरी माळ - लाल
24 सप्टेंबर - तिसरी माळ - निळा
25 सप्टेेंबर - चौथी माळ - पिवळा
26 सप्टेंबर - पाचवी माळ -हिरवा
27 सप्टेंबर - सहावी माळ- राखाडी
28 सप्टेंबर - सातवी माळ - नारंगी
29 सप्टेेंबर - आठवी माळ - मोरपंखी
30 सप्टेंबर -नववी माळ -गुलाबी