Airport Road Accident | फटाके फोडण्यास गेलेला तरुण उड्डाणपुलावरून खाली कोसळला

Airport Road Accident | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावरील घटना; अग्निशामक दलाने केला बचाव
Airport Road Accident
Airport Road Accident
Published on: 
Updated on: 

खांदा कॉलनी (पुढारी वृत्तसेवा): दिवाळीच्या उत्साहात फटाके फोडण्याचा आनंद घेताना एका युवकाला मोठी किंमत मोजावी लागली असती. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या नवीन उड्डाणपुलावरून एका युवकाने तब्बल १०० फूट खाली कोसळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (१० नोव्हेंबर) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र, अग्निशामक दलाच्या जवानांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या युवकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

Airport Road Accident
Panvel crime news: खांदा कॉलनीत बंद घराचे कुलूप तोडून ५.४१ लाखांचा ऐवज लंपास

मिळालेल्या माहितीनुसार, सागर जाधव यांनी रात्री १०.२५ वाजता अग्निशमन केंद्राला दूरध्वनी करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच दोन वाहनांसह अग्निशमन दल पथक ताраदीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पाहणी केली असता एक अज्ञात युवक उड्डाणपुलावरून खाली पडल्याचे निदर्शनास आले.

युवक नेमका कसा पडला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्याला वाचवण्यासाठी अग्निशमन दलने तातडीने विशेष बचाव मोहीम हाती घेतली. उड्डाणपुलाखालील घटनास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी दोन जवानांनी सुमारे दीड किलोमीटरचे अंतर पार केले.

Airport Road Accident
Panvel crime news: खांदा कॉलनीत बंद घराचे कुलूप तोडून ५.४१ लाखांचा ऐवज लंपास

या मोहिमेत तीन दोरखंड, एक बॉडी हार्नेस, हेलमेट आणि तीन टॉर्चचा वापर करण्यात आला. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत जवानांनी युवकाला दोरखंडाच्या साहाय्याने खालून वर खेचून सुरक्षित ठिकाणी आणले. जवानांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला.

दिवाळीच्या काळात फटाके फोडताना नागरिकांनी सुरक्षिततेचे भान राखणे किती आवश्यक आहे, याची जाणीव या घटनेने करून दिली आहे. युवकाचे नशीब बलवत्तर म्हणून तो या भीषण दुर्घटनेतून बचावला.

अग्निशामक दलाच्या जवानांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या बचाव मोहिमेत उपअग्निशमन केंद्र अधिकारी शुभम राठोड, प्रमुख अग्निशमन विमोचक शिवा आडे, यंत्रचालक आकाश नलवदे, शिवलाल अलदर तसेच अग्निशामक शुभांगी घुले, शंकर वाकडे, विक्रांत सपकाळ, सुनील मोरे, प्रीतम पाटील, निकितेश डुकरे आणि प्रणय म्हसकर यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.