Navi Mumbai Police | नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात मोठे फेरबदल; १० पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश!

प्रभारी अधिकाऱ्यांच्या पदस्थापनांमध्ये महत्त्वाचे बदल
Navi Mumbai Police
Navi Mumbai Policepudhari photo
Published on
Updated on

पनवेल : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे मोठे आदेश सोमवारी २९ जून रोजी जारी करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम २२ न (२) अंतर्गत जनहित आणि प्रशासकीय निकड लक्षात घेऊन आयुक्तालय स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेने १० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नव्याने पदस्थापना करण्यात आल्या आहेत.

जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभारी अधिकारी देविदास प्रभाकर कठाळे यांची रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभारी अधिकारी दिपक विजय सुर्वे यांची सानपाडा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली असून रबाळे एमआयडीसीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभारी अधिकारी सुनिल आनंदा वाघमारे यांची एन.आर.आय. पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

खारघर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक

प्रभारी अधिकारी दिपाली राहुल पाटील यांची उरण पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. सायबर विमानतळ पोलीस ठाण्यात तात्पुरते संलग्न असलेले पोलीस निरीक्षक सुरज ज्ञानदेव पाटील यांची खारघर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज अजितसिंह घोरपडे यांची न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

याचबरोबर गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्योती बाळासाहेब देशमुख यांची कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभारी अधिकारीपदी, तर गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळा रघुनाथ कुंभार यांची पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तुर्भे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन शंकर कदम यांची गुन्हे शाखा (AHTU) येथे बदली करण्यात आली असून गुन्हे शाखेतील चेतनाराज चौधरी यांची वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी जारी केलेल्या आदेशात संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी नव्या पदस्थापनेच्या ठिकाणी तातडीने हजर होऊन अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news