Navi Mumbai Airport |नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती
Navi Mumbai airport Chhatrapati Shivaji Maharaj statue inauguration
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल १ वर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.Pudhari
Published on
Updated on

Navi Mumbai airport Chhatrapati Shivaji Maharaj statue inauguration

पनवेल पुढारी वृत्तसेवा : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल १ वर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण अत्यंत उत्साहात पार पडले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विमानतळ परिसराचे प्रमुख आकर्षण

सुमारे आठ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत पूर्ण झालेली ही वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील एक प्रमुख आकर्षण ठरणार आहे. भव्य पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, महिला व बालविकास मंत्री अदिती सुनील तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर उपस्थित होते. भूमिपुत्र स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापक यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

Navi Mumbai airport Chhatrapati Shivaji Maharaj statue inauguration
Pratap Sarnaik : अयोध्येतील मंदिराच्या धर्तीवर तुळजाभवानी मंदिराचे रूप बदलणार

नितीन गोर्डे यांनी साकारला पुतळा

नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (NMIAL) द्वारे विकसित करण्यात आलेल्या या स्मारकामध्ये ८ फुटांच्या भव्य चबूतऱ्यावर १२ फुटांचा कांस्य धातूचा अर्धपुतळा बसवण्यात आला आहे. नवी मुंबईतील 'आकार आर्ट अँड स्कल्पचर'चे शिल्पकार श्री. नितीन रोहिदास गोर्डे यांनी हा पुतळा साकारला असून, महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाने मान्यता दिलेल्या प्रारूपावर आधारित कॉपर अलॉय ब्रॉन्झ (तांबे मिश्रित कांस्य) मध्ये याची निर्मिती करण्यात आली आहे.

Navi Mumbai airport Chhatrapati Shivaji Maharaj statue inauguration
पुतळा दुरुस्तीवरून लोकांची दिशाभूल करू नये; आ. नरेंद्र मेहता यांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना सल्ला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news