D. B. Patil airport naming : विमानतळ नामांतरण आंदोलन चिघळणार, ३०० जणांवर गुन्हा

पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Airport renaming protest
Airport renaming protestpudhari photo
Published on
Updated on

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक, पनवेल येथे बुधवारी (८ जुलै) करण्यात आलेल्या आंदोलनाप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी प्रमुख आंदोलकांसह २०० ते ३०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे विमानतळ नामांतरण आंदोलन चिघळणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जुलै रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक येथ रश्मिता राम पोपेटा, कांतीलाल कडु, आदित्य पोपेटा, अवंतिका पोपेटा तसेच त्यांच्या समर्थकांनी विनापरवाना आंदोलन सुरू केले. या आंदोलनात सुमारे २०० ते ३०० पुरुष व महिला सहभागी झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

Airport renaming protest
Nashik | कळमुस्ते खून प्रकरणात आरोपीला जन्मठेप

आंदोलनामुळे चौकात वाहतुकीची कोंडी होऊन सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना जमाव बेकायदेशीर असल्याचे सांगून तेथून निघून जाण्याच्या सूचना दिल्या. मात्र आंदोलकांनी रस्त्यावर बसकण मारून आंदोलन सुरूच ठेवले, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

शासकीय कामात अडथळा तसेच पोलिसांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिल्यानंतर काही आंदोलकांनी उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्यादीवरून पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल डोळस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news