Airport Safety Concerns: नवी मुंबई विमानतळाच्या सुरक्षेला कत्तलखान्यांचा विळखा; धावपट्टीजवळच नियमांची ऐशीतैशी

कार्यवाही करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
Airport Safety Concerns
Airport Safety ConcernsFIle Photo
Published on
Updated on

उरण: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी उड्डाणे सुरू होऊन 100 दिवस उलटले तरी हवाई सुरक्षेचा प्रश्न अद्याप ऐरणीवरच आहे. विमानतळाच्या धावपट्टीपासून अवघ्या 3 किमी अंतरावर असलेल्या उलवे परिसरात आजही उघड्यावर बकऱ्या आणि कोंबड्यांची कत्तल सुरू असल्याने बर्ड हिटचा (पक्षी धडक) धोका गंभीर झाला आहे. प्रशासनाच्या कागदोपत्री कारवाया आणि जमिनीवरील वास्तव यात मोठी दरी असल्याचे ताशेरे पर्यावरण कार्यकर्त्यांनी ओढले आहेत.

नॅटकनेक्ट फाउंडेशनने माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ने सांगितले की, स्थानिक प्रशासनासोबत संयुक्त पाहणी करून अहवाल सादर करण्यात आले आहेत. मात्र, नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी यावर आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की: पाहणी केल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात जमिनीवर कोणतीही सुधारात्मक कारवाई झालेली नाही. केवळ अहवाल बनवून आणि कागदी घोडे नाचवून हवाई सुरक्षा रामभरोसे सोडली जात आहे.“

Airport Safety Concerns
Panvel News: पनवेल मनपाची पहिली महासभा पाण्याने सापडली वादात; योग्य कार्यवाहीचे आदेश

उलवे येथील कार्यकर्ते करण चावला यांनी सांगितले की, अलीकडच्या सणासुदीच्या काळात या अवैध कत्तलींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मांसाच्या अवशेषांची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जात नसल्याने परिसरात पक्ष्यांचा वावर वाढला आहे.

याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अप) नेते संतोष काटे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अधिकाऱ्यांनी एसी केबिनमधून बाहेर पडून प्रत्यक्ष पाहणी करावी, असे आव्हान त्यांनी दिले आहे. “मी स्वतः अधिकाऱ्यांसोबत फिरून हे अवैध प्रकार दाखवायला तयार आहे, पण यंत्रणांना हा धोका रोखण्यात रस नसल्याचे दिसते,“ असे काटे यांनी नमूद केले.

Airport Safety Concerns
Raigad Fort Development: किल्ले रायगडावरील कामात चुकारपणा नको; संभाजीराजे छत्रपती यांचा इशारा

वाढता धोका लक्षात घेता, ने पक्षी आणि वन्यजीव धोक्यांचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी एका विशेष तज्ज्ञ संस्थेची नियुक्ती केली आहे. या अभ्यासानंतर सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याचे आश्वासन देण्यात आले असले तरी, जोपर्यंत उघड्यावरील कत्तली थांबत नाहीत, तोपर्यंत प्रवाशांचा जीव टांगणीलाच राहणार आहे.

10 किमी परिसरात निर्बंध

नागरी विमानन महासंचालनालयाच्या नियमांनुसार, विमानतळ परिसराच्या 10 किमी त्रिज्येमध्ये कत्तलखाने, उघड्यावर मांसविक्री किंवा कचरा टाकण्यास सक्त मनाई आहे. मांस आणि त्यातील अवशेषांमुळे घार, गिधाडे यांसारखे मोठे शिकारी पक्षी आकर्षित होतात, जे विमानांच्या इंजिनला धडकल्यास मोठा अपघात होऊ शकतो. मात्र, उलवे परिसरात या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news