Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळ आता २४ तास कार्यन्वित; हवाई प्रवासाला नवे बळ

१ फेब्रुवारीपासून रात्रंदिवस विमानसेवा, उड्डाणसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता
Navi Mumbai International Airport
Navi Mumbai International AirportPudhari
Published on
Updated on

पनवेल : नवी मुंबई विमानतळ 25 डिसेंबरपासून प्रवाशांसाठी सुरू झालं होतं. त्यावेळी हे विमानतळ फक्त 12 तासांसाठी कार्यन्वित होतं, परंतु 1 फेब्रुवारीपासून 24 तास सुरू ठेवण्यातआले आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 8 पर्यंत सुरू असलेलं विमानतळवर आता 24 तास विमानसेवा सुरू राहतील. यामुळे विमानतळावरील उड्डाणांची संख्या लवकरच वाढणार आहे.

Navi Mumbai International Airport
Tantamukt Gaav Yojana: ग्रामीण संघर्षांची वाढती धार : तंटामुक्त समिती सक्षम करण्याची गरज

सध्या केवळ दोनच विमानांची भर घालण्यात आली आहे, परंतु येत्या काही दिवसांत आणि आठवड्यांत विमान कंपन्या नवी मुंबईतील आपले वेळापत्रक वाढवतील अशी अपेक्षा आहे, असे सूत्रांनी सांगितले. मार्च महिन्याच्या अखेरीस, जेव्हा विमान कंपन्यांचे उन्हाळी वेळापत्रक सुरू होईल, तेव्हा विमानसेवेच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

Navi Mumbai International Airport
Raigad Zilla Parishad Election: रायगड जिल्हा परिषद निवडणूक : जुन्या चेहऱ्यांची कसोटी, नव्यांसाठी संधी

प्रवाशांना रात्रभर सेवा

12 जानेवारी रोजी, नवी मुंबई विमानतळाने एक महत्त्वाचा परिचालन टप्पा पार केला होता. विमानतळ सुरू झाल्यापासून फक्त 19 दिवसांत तब्बल 1 लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. युरोप आणि अमेरिकेत, प्रमुख विमानतळ वगळता, बहुतेक विमानतळे ध्वनी प्रदूषण मर्यादित करण्याच्या रात्रीच्या संचारबंदीच्या नियमांनुसार, सहसा रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत बंद होतात. ही विमानतळे बंद झाल्यावर अडकलेल्या प्रवाशांना टर्मिनल सोडावे लागते. परंतु, भारतातील प्रमुख विमानतळे 24 तास खुली राहतात. यामुळे विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांना रात्रभर राहण्यासाठी एक सुरक्षित जागा मिळते.

Navi Mumbai International Airport
Union Budget Konkan Development: केंद्रीय अर्थसंकल्पाने कोकणच्या विकासाची उघडली नवी कवाडे; मत्स्योद्योग, काजू-नारळ, बंदर व रेल्वेला मोठा निधी

शेवटचं उड्डाण कधी?

अद्याप रात्री उशिराच्या कोणत्याही विमानांचं वेळापत्रक निश्चित केलंलं नाही पण लवकरच मध्यरात्रीच्या सेवा ही सुरू करण्यात येतील. सध्या नवी मुंबई विमानतळावरील शेवटचं विमान रात्री 9.50 ला उड्डाण घेणार असून, पहिलं उड्डाण सकाळी 7.10 वाजता होणार आहे. विमान वाहतूक उद्योगातील सूत्रांनी सांगितले की, उन्हाळी वेळापत्रक सुरू झाल्यावर आणखी विमानांची भर घातली जाईल. सध्या प्रतितास 10 विमानांची हालचाल असलेली संख्या येत्या एप्रिल महिन्यापर्यंत दुप्पट म्हणजेच, 20 होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news