Raigad News | सिडकोचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्यापही अपूर्णच

साडेअठरा एमएलडी प्रकल्पात एक एमएलडी सांडपाण्यावरच प्रक्रिया
उरण,  रायगड
सिडकोच्या सर्व वसाहतींमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी द्रोणागिरी नोडमध्ये फुंडे गावाजवळ सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प उभारला आहे.Pudhari News Network
Published on
Updated on

उरण : राजकुमार भगत

सिडकोच्या सर्व वसाहतींमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी द्रोणागिरी नोडमध्ये फुंडे गावाजवळ सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प उभारला आहे. सुमारे 18.5 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची या एसटीपीची क्षमता आहे. करोडो रूपये खर्च करून हा सांडपाणी प्रक्रिया प्लान्ट उभारला आहे. गेले कित्येक वर्षापासून या सांडपाणी प्रकल्पात फक्त एक ते दीड एमएलडी सांडपाण्यावरच प्रकिया केली जात असल्याने या प्लान्ट मध्ये पूर्ण क्षमतेने सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात नाही. शिवाय येथे असणार्‍या कर्मचार्‍यांच्या पगारावर आणि या प्लाण्टच्या देखभाल दुरूस्तीवर शासनाचा कोट्यावधी रूपयांचा चुराडा होत आहे.

सिडकोतील बहुतांश वसाहतीतील सांडपाणी एन -1 मधील पंपहाऊसमध्ये एकत्रित करून पाइपलाइनद्वारे या प्रकल्पात पुढील प्रक्रियेसाठी सोडणे आणि प्रकल्प चालवणे अशी ही योजना होती. सिडकोतील सर्वच वसाहतींमधील सांडपाण्यावर प्रक्रिया व्हावी हा यामागे उद्देश होता. मात्र मागील कित्येक वर्षापासून हा प्रकल्प धुळखात पडून होता. काही महिन्यांपासून हा प्रकल्प सूरू करण्यात आला असून येथे फक्त जेमतेम एक ते दिड एमएलडी सांडपाण्यावरच प्रक्रिया केली जाते. सध्या जेएनपीटी वसाहतीमधून येणार्‍या सांडपाण्यावरच प्रक्रिया केली जाते. येथे येणार्‍या सांडपाण्यातील घटकांचे विघटन करून त्यातील शुद्ध होणारे पाणी समुद्रात सोडले जाते.

वास्तविक पहाता हा सिव्हरेज ट्रिटमेंट प्लाण्ट उभारण्या अगोदर सिडकोच्या वसाहतींमधील तयार होणारे सांडपाणी एकत्र करण्यासाठी प्रत्येक वसाहतींमधून पाईप लाईन टाकणे गरजेचे होते. मात्र सिडकोने तशी कोणतीही व्यवस्था केली नाही त्यामुळे द्रोणागिरी नोड मध्ये तयार होणारे सांडपाणी थेट समुद्रात किंवा खाडीमध्ये सोडले जाते आणि त्यामुळे तेथिल समुद्रातील किंवा खाड्यांचे पाणी प्रदुषित होते. त्याचा परिणाम येथिल पारंपारिक मच्छिमारीवर अप्रत्यक्षपणे होत आहे.

उरणमधीलहा सिव्हरेज ट्रिटमेट प्लाण्ट हा साडे अठरा एमएलडी क्षमतेचा आहे. वास्तविक पहाता येथे अख्या उरण तालुक्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया होऊ शकेल एवढा मोठा हा प्लाण्ट आहे. या प्लाण्टमध्ये चार मोठ्या पाण्याच्या टाक्या असून येथे या पाण्यातील कचरा विघटीत केला जातो आणि त्यानंतर या पाण्यावर प्रक्रिया केली जाते.

उरण तालुक्यातील सिडको वसाहतींमधील सांडपाणी येथे आणून ते प्रक्रिया करून समुद्रात सोडण्याची ही योजना आहे. मात्र या प्लाण्टमध्ये क्षमतेएवढे सांडपाणी जमा होत नाही. त्यामुळे सध्या येथे एक ते दिड एमएलडी सांडपाण्यावरच प्रक्रिया केली जाते. सध्या द्रोणागिरी सिडको वसाहतीतील सांडपाणी येथे आणण्यासाठी पाईपलाईनचे काम सुरू आहे ते काम पूर्ण झाल्यानंतर हा प्लाण्ट पूर्ण क्षमतेने सूरू होईल.

दीपक वार्के, (अभियंता, एसटीपी द्रोणागिरी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news