

नागोठणे शहर : महेंद्र माने
नागोठणे परिसरात वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाचे डोंगर माथ्यावरुन आलेले थेट नागोठणे शहरातील घरात घुसले.यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ठेकेदाराने नैसर्गिक नाला तोडून व नवीन नाल्याचे मुख्य बाजू बंद न केल्याच्या प्रतापामुळे पाणी नवीन नाल्यातून शहरात घुसले. महामार्गालगत असल्याच्या अंगार आळीतील घरात शिरल्याने नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अनेक वर्षापासून चालू असलेल्या महामार्गाच्या रस्त्याचे काम आहे. त्यामध्ये जोगेश्वरी नगर येथून महामार्गावरील मोरीच्या सहाय्याने येणारा नैसर्गिक मुख्य नाला हा महामार्ग ठेकेदाराने मागील काही महिन्यांपासून रस्ता करताना तोडून ठेवला व येणाऱ्या नाल्याचे कोणतेही नियोजन केले नाही. याबाबत ग्रामपंचायतीने सदरच्या नाल्याचे रुंदीकरण करण्याबाबत जानेवारी 25 रोजी प्रोजेक्ट डायरेक्टरना लेखी पत्र देत काम दीड महिने थांबून ठेवले होते, त्यावेळी नाल्याचे काम प्रामुख्याने करून मगच इतर बांधकाम सुरू करू असे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानंतर काम सुरू करण्यात आले. परंतु नाल्याचे कोणतेही काम नियोजनबद्ध असे केले नाही.
तसेच जुना नैसर्गिक नाला तोडून नवीन नाला टाकण्यात येत असताना शुक्रवारी आलेल्या अवकाली पावसाचे डोंगर माथ्यावरून येणारे पाणी नवीन नाल्याचे मुख्य तोंड बंद न केल्याने व केलेल्या बांधकामामुळे पाणी नैसर्गिक मार्गाने न जाता नवीन नाल्याचे पाणी मोठ्या प्रमाणात नागरी वस्तीमधील आंगर आळीमध्ये शिरले. ते पाणी जोगेरी माता मंदिरमार्गे पोस्ट ऑफिसच्या दिशेने वाहत असल्यामुळे रस्त्यावर साधारणतः एक ते दीड फूट पाणी साचले होते.
तसेच आळीमध्ये अचानक आलेला पाण्यामुळे नागरिकांच्या घरासमोर लहान मोठे साहित्य वाहून गेले . घरात पाणी शिरल्याने अन्नधान्य व इतर वस्तूंचे नुकसान झाले असल्याची ग्रा.पं. सदस्य - ज्ञानेश्वर साळुंखे,सचिन ठोंबरे व सदस्या भावीका गिजे व भारत गिजे यांनी दिले. सदरील झालेल्या नुकसानीस जबाबदार कोण? असा प्रश्न नागोठाणेकर नागरिक विचारीत आहेत. यांनी दिली.
नेहमी प्रमाणे जरा ढगाचा गडगडाट किंवा विजा चमकू लागल्याने लगेच जाणारी लाइट यावेळी मोठ्या प्रमाणात वादळ वाऱ्यासह पडलेल्या पावसात नेहमीप्रमाणेबत्ती गुल झाल्याने आलेल्या प्रसंगाला गावातील नागरिकांना बॅटरी व मोबाइल लाईटच्या सहाय्याने सामना करावा लागला.
पोलिसांच्या मदतीने अनर्थ टळला
घटनेची माहिती नागोठणे सहा.पो. नि. सचिन कुलकर्णी यांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जेसीबीच्या माध्यमातून नवीन नाल्याचे तोंड गर्डल व माती टाकून बंद केल्याने नागरी वस्तीत जाणारे पाणी बंद झाले. जुना नैसर्गिक नाल्याच्या दिशेने पाण्याचा प्रवाह सुरू केल्याने वस्तीत जाणारे पाणी हळूहळू ओसरू लागल्याबद्दल कुलकर्णी यांचे सर्व आंगर आळी व नागोठणे ग्रामस्थ यांनी कौतुक व आभार मानले.
जी नैसर्गिक जुनी मोरी प्रमाणेच मोठी चांगली मोरी टाकण्याची विनंती करून लेखी पत्र व सदरील काम दीड महिना बंद ठेवले त्यावेळी हायवेचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून आश्वासन दिलं की आम्ही पूर्णपणे नियोजन करून आणि मगच आम्ही या मोरीला हात लावू असं सांगितल्याने आम्ही काम करण्यास परवानगी दिली. परंतु त्यांनी कोणत्याही पूर्वनियोजन न करता छोटे पाईप टाकले आणि त्यामूळे अंगार आळी येथे शिरून शहरात गेल्याने ते पाणी नागरिकांच्या घरात जाऊन त्यांचे नुकसान झाले आहे. तसेच या प्रवाहामुळे जोगेश्वरी नगर येथे जाणाऱ्या पाण्याची पाइप लाईन तुटली आहे.
सुप्रिया महाडीक सरपंच,ग्रामपंचायत नागोठणे