Murud-Janjira Development Plan: मुरुडमधील कोळी समाजाला आधुनिक सुविधा मिळणार; मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन

मासेमारीपासून पर्यटनापर्यंत विविध क्षेत्रांचा समतोल विकास साधण्यावर भर देत स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
Murud-Janjira Development Plan
Murud-Janjira Development PlanPudhari
Published on
Updated on

मुरुड जंजिरा : मुरुड-जंजिरा परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि कोळी समाजासाठी आधुनिक सुविधा आणि पर्यटनाला चालना देणारा व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे. मासेमारीपासून पर्यटनापर्यंत विविध क्षेत्रांचा समतोल विकास साधण्यावर भर देत स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुरुड-जंजिरा नगरपरिषद हद्दीतील विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.कोळी समाजाचे नेते ह्या प्रकल्पाचा कोळी महिला व युवान फायदा व्हावा म्हणून अनेक वर्ष प्रयत्न करत आहे.

त्यांना संपूर्ण कोळी समाजाने चांगली साथ दिली आणि आज प्रकल्प पुंर्ण होण्यासच पहिले पाऊण पडल्याने कोळी समाज खुश आहे. मुरुड-जंजिरा हा पर्यटन आणि मच्छीमारांचा परिसर म्हणून ओळखला जातो. पारंपरिक मासेमारी व्यवसाय करणाऱ्या कोळी समाजाच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनाआवश्यक असलेल्या आधुनिक सुविधा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

Murud-Janjira Development Plan
Pen City Road Development: पावसाळ्यापूर्वी पेणचे रस्ते होणार हायटेक

यामध्ये जेट्टी उभारणी, बर्फगृहे (कोल्ड स्टोरेज), मासळी साठवण केंद्रे, तसेच बोट दुरुस्ती सुविधा यांचा समावेश आहे. या उपाययोजनांमुळे मच्छीमारांचे दैनंदिन काम सुलभ होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

मुरुड-जंजिरा परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने अधिक विकास करण्यावरही भर देण्यात आला आहे. कोळी संस्कृती जपत बॅकवॉटर प्रकल्प, होमस्टे, स्थानिक खाद्यपदार्थ, बोटिंग यांसारख्या उपक्रमांना चालना दिली जाणार आहे. पर्यटकांना आकर्षित करण्याबरोबरच स्थानिकयुवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

पर्यटन आणि मत्स्य विभाग यांच्या समन्वयातून या योजना प्रभावीपणे राबवण्यात येणार असून, विकास प्रक्रियेत स्थानिकांचा सक्रिय सहभाग वाढवण्यावरही विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळे मुरुड-जंजिरा केवळ पर्यटनाचे केंद्र न राहता, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर भाग म्हणून विकसित होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Murud-Janjira Development Plan
Girgaon Kelewadi bridge: पुलाऐवजी लिफ्ट; गिरगावकर संतप्त; 6 वर्षे लढा देऊनही केळेवाडीच्या पुलाला मुंबई महापालिकेकडून तिलांजली

या बैठकीला मत्स्य आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, पर्यटन सचिव संजय खांदारे, मुरुड नगराध्यक्षा आराधना दांडेकर, मुख्याधिकारी सचिन बच्छाव तसेच जय भवानी मच्छिमार संस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील व मच्छीमार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news