Murder | खालापुरात दोन मजुरांमध्ये शुल्लक कारणावरुन वाद, एकाची हत्या

डोक्यात मारला हातोडा
Murder
खालापुरात दोन मजुरांमध्ये शुल्लक कारणावरुन वाद, एकाची हत्या File Photo

खालापूर : पुढारी वृत्तसेवा

मजुरी करिता गोंदिया येथून खालापूर, येथे आलेल्या दोन कामगारांमध्ये झालेल्या क्षुल्लक वादातून हातोडा डोक्यात मारुन ठार मारण्याची घटना खालापूरात घडली आहे.

सचिन प्रभु नेवाळे (28, रा. गोंदिया) आणि त्याचा नातेवाईक सतीश चैतराम भोंडे (गोदींया) इतर मजुरांसोबत खालापूर येथे मजुरीच्या कामासाठी आले होते. सोमवारी जेवण आणि मद्यपान झाल्यानंतर सतीश आणि सचिन या दोंघामध्ये भांडण झाले. सतीशने रागाचे भरात सचिनच्या डोक्यात हातोडा मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीसांनी घटनास्थळावरून आरोपी सतीश याला ताब्यात घेत गुन्हा दाखल करत अटक केली

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news