Mumbai to Madgaon special train| कोकणासाठी मुंबई ते मडगाव विशेष रेल्वे गाडी ; १४ जुन रोजी होणार सुरू

या विशेष गाडीच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे रेल्वे प्रशासनाकडून आवहन
Konkan Railway
Konkan Railway Pudhari
Published on
Updated on

महादेव सरसंबे

रोहे : मध्य रेल्वे उन्हाळ्याच्या हंगामात प्रवाशांच्या मागणीनुसार १४ जुन रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते मडगाव दरम्यान एकमार्गी विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. याचा लाभ कोकणातील प्रवाशांनी घ्यावे असे आवाहन मध्य रेल्वे प्रवाशांना करण्यात आले आहे.

Konkan Railway
Central Railway | मध्य रेल्वेतर्फे उन्हाळी विशेष गाड्या, मुंबई आणि मडगाव दरम्यान २ सेवा आणि मुंबई ते सोलापूर १ एकेरी विशेष गाडी

१४ जुन रोजी चालविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव एकमार्गी विशेष गाडी क्रमांक 01173 विशेष गाडी दिनांक १४.०६.२०२६ (रविवार) रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी (मध्यरात्री) ०१.३० वाजता मडगावला पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी हे थांबे देण्यात आले आहेत.या गाडीची संरचना ३ वातानुकूलित चेअर कार, १० द्वितीय चेअर कार (६ आरक्षित आणि ४ अनारक्षित), १ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार अशी आहे.

Konkan Railway
Konkan Railway | मध्य रेल्वेकडून कोकणवासियांना दिलासा, १० अतिरिक्त उन्हाळी गाड्या चालवणार

एकमार्गी विशेष गाडी क्रमांक 01173 साठी विशेष शुल्कासह आरक्षण ८ जुन पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. अनारक्षित डब्यांसाठी तिकिटे सामान्य दराने UTS प्रणालीद्वारे घेता येतील. प्रवासी तिकिट बुकिंगसाठी RailOne ॲप देखील डाउनलोड करू शकतात. या विशेष गाडीच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा. असे आवाहन मध्य रेल्वेने आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news