Mumbai Goa Highway | मुंबई–गोवा महामार्गावर ट्रेलरच्या केबिनला आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत
railer Cabin Fire
railer Cabin Fire Pudhari
Published on
Updated on

Trailer Cabin Fire Mumbai Goa Highway

कोलाड : मुंबई - गोवा महामार्गावरील आंबेवाडी बाजारपेठेत बुधवारी (दि.१८) सकाळी ट्रेलरच्या केबिनला अचानक आग लागल्याची घटना घडली. चालकाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, खांब बाजूकडून विळा-भागाड येथील POSCO कंपनीकडे कॉईल घेऊन जाणारा ट्रेलर (क्र. MH 14 JU 6659) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास आंबेवाडी बाजारपेठेतील वाघमारे चहा स्टॉलसमोर आला असता, चालू अवस्थेत असलेल्या ट्रेलरच्या केबिनने अचानक पेट घेतला.

railer Cabin Fire
Mumbai Goa National Highway: मुंबई-गोवा महामार्गावर गचके, लाईट बंद; पोलादपूरजवळ पादचारी पुलाचे काम रखडले

ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने तातडीने वाहन बाजूला उभे केले आणि प्रसंगावधान राखत जवळील चहा स्टॉलमधून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. आग पूर्णपणे विझवल्यानंतर कोलाड पोलिसांच्या प्रयत्नांमुळे वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news