

Mumbai-Goa Highway Shivshahi Bus Truck Accident
माणगाव: मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर कळमजे पुलाजवळ बुधवारी (दि. २६) सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. मुंबई–मालवण शिवशाही बस (MH 09 EM 9074) आणि सीएनजी ट्रकची (MH 43 CK 3421) समोरासमोर धडक झाली. यात शाम सुंदर गावडे (वय ८५, रा. विक्रोळी, कन्या मोहरनगर, मुंबई) यांचा माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर दहा जण जखमी झाले.
अपघाताचा जोर इतका भीषण होता की, शिवशाही बसचा पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे आणि वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तर गावडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अंकुश चंद्रकांत मेस्त्री (५४), रा. आचरा, मालवण
शशिकांत शंकर तावडे (७२), रा. पन्हाळे, जि. रत्नागिरी
प्रशांत शशिकांत राजशिर्के (४०), रा. शिंदेवाडी–कोडमला, जि. रत्नागिरी
सुप्रिया सुधाकर मोरे (५५), रा. विक्रोळी, मुंबई
प्रतिभा प्रकाश नागवेकर (५९), रा. संगमनेर, जि. रत्नागिरी
आर्या अमित मयेकर (३८), रा. संगमेश्वर, जि. रत्नागिरी
गायत्री अमित मयेकर (१३), रा. संगमेश्वर, जि. रत्नागिरी
अक्षता अनंत पोळवणकर (४०)
दीपाली तुकाराम मोकळ (३०), रा. आमटेम, जि. रायगड
आयशा अमित मयेकर (६), रा. संगमेश्वर, जि. रत्नागिरी
ट्रकमध्ये सीएनजी असल्याने मोठी दुर्घटना टळली. महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नांमुळे वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.