Raigad news| मुंबई-गोवा महामार्गाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आंबेवाडी नाका येथे साखळी उपोषण सुरु

मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरुच ठेवणार असल्याचा आंदोलकांचा इशारा
Raigad news| मुंबई-गोवा महामार्गाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आंबेवाडी नाका येथे साखळी उपोषण सुरु
Published on
Updated on

विश्वास निकम

कोलाड: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६वरील आंबेवाडी कोलाड वरसगांव येथील VUP उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला २०० मिटर अंतरावर अंडरपास बोगदे देण्यात यावे, सर्विस रोडचे काम आजपर्यंत पुर्ण झाले नाही ते काम पूर्ण करून देणे, गटारावरील झाकणे बसवून देणे, तसेच सदर अंडरपास पेण, नागोठणा, लोणेरे, महाड येथे ठेवले आहेत.

मग आंबेवाडी कोलाड वरसगाव आमच्या वरच अन्याय का? अशा विविध मागण्यासाठी आंबेवाडी बाजारपेठेतील द.ग.तटकरे चौकात आंबेवाडी कोलाड वरसगाव पंचक्रोशीतील सर्व जागरूक नागरिक यांनी सोमवारपासून (दि.५ जानेवारी) साखळी उपोषण सुरु केले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे उपोषण सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

यावेळी आंबेवाडी ग्रामपंचायततीचे माजी सरपंच सुरेशशेठ महाबळे,चंद्रकांत लोखंडे, गणेश शिंदे, महेंद्र वाचकवडे,संजय कुर्ले,दयाराम पवार,चंद्रकांत जाधव, समीर महाबळे,बबलु सय्यद,भाऊ गांधी,शब्बीर शेठ सय्यद,विजय बोरकर,मंगेश सरफळे,उदय खामकर,विश्वास बागुल ,विष्णु महाबळे, बिंदास धनावडे, नाना शिंदे,रविंद्र मामळुस्कर, तुकाराम सानप,बाळा हाडके, दगडू हाटकर,महादेव लोखंडे,तसेच असंख्य व्यापारी,कोलाड परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

आंबेवाडी वरसगांव नाका हे मध्यस्ती ठिकाण असुन येथे विळा ते कोलाड, इंदापूर ते कोलाड, रोहा ते कोलाड, तसेच खांब ते कोलाड, चिंचवली तर्फे अतोणे ते कोलाड या चारही बाजूनी असंख्य नागरिक येजा करीत असतात. परंतु कोलाड येथे येजा करण्यासाठी अंडरपास रस्ता नसल्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना एक किलोमीटर अंतरावर पुढे जाऊन वलसा घालावे लागत असल्यामुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असुन येथे दोन अंडरपास रस्ता व्हावा यासाठी आम्ही साखळी उपोषण करीत आहोत. यासाठी मुबंई हायकोर्टात याचिका दाखल केली असुन जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत तोपर्यंत आम्ही साखळी उपोषण सुरु ठेवणार.

सुरेशदादा महाबळे (माजी सरपंच, आंबेवाडी)

आंबेवाडी नाका येथे ७२ खेडेगावातील नागरिक येजा करीत असतात परंतु येथे अंडरपास रस्ता नसल्याने येथील नागरिक,व्यापारी वर्ग,रिक्षा,मिनिडोअर,टेम्पो चालक याच्या अडचणी वाढत आहेत.या मतदार संघातील रोहा सुधागडचे आमदार रवीशेठ पाटील यांना आम्ही निवडून दिले परंतु ते निवडून आल्यानंतर या मतदार संघात फिरकले नाही. जर त्यांनी अंडरपास रस्ता करून दिला तर मी अनवानी चालत जाऊन त्याच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करीन.

विश्वास बागुल (कुणबी समाज युवानेता)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news