मुंबई - गोवा महामार्ग ‘ग्रीन फील्ड’ झालाच नाही

नियोजनाअभावी झाडेच सुकली; लाखो लिटर पाणी तसेच लागवडीचा खर्च गेला वाया
कोलाड, रायगड
मुंबई - गोवा महामार्गPudhari News Network
Published on
Updated on

कोलाड : विश्वास निकम

मुंबई - गोवा महामार्गावरुन प्रवास करताना तो आल्हाददायक आणि हिरव्यागार बहरलेल्या वृक्षांच्या सावलीतून जाणारा असणार, तो ग्रीन फील्ड महामार्ग असणार अशा भूलथापा मारण्यात आल्या. प्रत्यक्षात मात्र राज्यकर्त्यांच्या नियोजनाअभावी, ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे महामार्गावर नंदनवन सोडाच रस्त्याच्या मधोमध जी काही झाडे लावली होती ती उन्हामुळे करपून गेल्याने महामार्गाला अवकळा आली आहे. हायवेवरील सावलीच गायब झाली आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील दुतर्फा रस्त्याच्या मधोमध लाखो फुलझाडे लावण्यात आली असुन त्याचा नियोजन मात्र शुन्य असल्यामुळे नको त्या वेळी पाणी मारून लाखो लिटर पाणी वाया जात असुन लावण्यात आलेली फुलझाडे सुकून गेली व शासनाच्या तिजोरीतील करोडो रुपये वाया जात असल्याचे दिसून येत आहे.तसेच रस्त्याच्या दुतर्फा उंच झाडे लावली गेली नसल्याने प्रवाशी वर्गाला सावलीची प्रतीक्षा करावी लागत आहे.

मुंबई-गोवा हायवेवर नंदनवन फुलावा या उद्देशाने दुतर्फा रस्त्याच्या मधोमध फुलझाडे लावण्यात आली. परंतु ही फुलझाडे जुन महिन्यात पावसाळा सुरु झाल्यानंतर लावली असती तर ती जगली असती परंतु पावसाळा संपल्यावर ही फुलझाडे लावण्यात आली त्यांना वेळेवर पाणी न मिळाल्यामुळे तसेच ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे ही फुलझाडे सुकून गेली आहेत.

तापमानाचा पारा 38 अंशाच्या वर गेला असुन अशा तापमानात भर दुपारी पाणी मारल्याने हे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. कारण या कडक उन्हात माती गरम होत असून, यामुळे फुलझाडांना मारलेले पाणी मुळापयर्ंत जाऊन गरम होत . यामुळे ही फुलझाडे सुकून गेली आहेत. याउलट हाच पाणी सकाळी नऊ वाजता व संध्याकाळी 5 च्या नंतर मारला असता तर काही प्रमाणात काही फुलझाडे जगली असती परंतु लागवड केलेल्या फुल झाडांना भर उन्हात पाणी मारल्यामुळे ही फुलझाडे सुकून गेली आहेत. याला जबाबदार कोण ठेकेदार की ठेकेदारावर वचक नसलेला शासन असे प्रवाशी वर्गातून बोलले जात आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी रस्त्याच्या दुतर्फा वर्षनुवर्षे उभी असणारी भली मोठी असणारी झाडे तोडण्यात आली परंतु त्याच्या जागी नवीन झाडे लावण्यात आली नाही. यामुळे यामार्गांवरून प्रवास उन्हाच्या रखरखाटामध्ये करावा लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फा सावली देणारी उंच वाढणारी वड, पिपंळ, व इतर झाडे लावण्यात आली नसल्याने दिवसेंदिवस पर्यावरणाच्या साखळीत बाधा येऊन धोका निर्माण झाला आहे.

चौपदरीकरणाच्या कामाला 18 वर्षे पूर्ण झाली तरी हे काम पूर्ण होईना.या कामासाठी तोडण्यात आलेल्या झाडांच्या जागी नवीन झाडे लावली असती तर अद्याप ती मोठी झाली असती.परंतु या मार्गांवर नवीन झाडे लावली गेली नसल्याने याचा फटका प्रवासी वर्गाला बसत दिवसापासून उन्हाचा कडाका वाढला असुन महामार्गांवरून प्रवास करणे अडचणीचे ठरत ठिकाणी निवारा शेड नसल्यामुळे गावागावतील प्रवाशांना एसटीची वाट पाहत कडकडीत उन्हात उभे रहावे लागत आहे. याकडे ना महामार्ग विभागाचे लक्ष, ना लोकप्रतिनिधीचे लक्ष आहे.

वन विभागाला वृक्ष लागवडीसाठी 17 कोटी

मुंबई-गोवा महामार्गांवरील रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी वनविभागाला दोन वर्षांपूर्वी 17 कोटी निधी वर्ग केला होता. परंतु तेव्हा झाडे लावण्यात आली नाही. याला कारण महामार्गाचे काम पूर्ण झाले नसल्याने आलेला निधी टॅप झाला. आणि झाडे लावण्यात दिरंगाई झाली असल्याचे कारण पुढे करण्यात आला आहे.तर काही ठिकाणी झाडे लावण्यासाठी खड्डे ही मारण्यात आले परंतु झाडे लावण्यात आली नाही. यामुळे या मार्गांवर केव्हा हिरवेगार गतवैभव प्राप्त होईल हे सांगता येत नाही याचा त्रास मात्र प्रवासी वर्गाला भोगावा लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news