Mumbai Goa Highway Accident | मुंबई-गोवा महामार्गावर कारची कंटेनरला धडक: २ ठार, दोन जण जखमी

पुई स्टॉपजवळ सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास अपघात
Mumbai Goa Highway Car Accident
कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने कारचा झालेला चक्काचूर Pudhari
Published on
Updated on

Mumbai Goa Highway Car Accident

कोलाड : मुंबई - गोवा महामार्गावरील पुई गावाच्या हद्दीत पुई बस स्टॉपजवळ कारने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीरपणे जखमी झाले आहे. ही घटना शनिवारी (दि.१३) सकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ७.१५ वाजता फिर्यादीच्या ताब्यातील कंटेनर (एम.एच. ११ डी.डी. ०४२५) मुंबईकडून कोलाड कडे जात होता. पुई गावाच्या हद्दीतील पुई स्टॉपजवळ आल्यानंतर, मुंबईकडून कोलाडकडे येणाऱ्या एका कारने (एम.एच. ४६ सी.यू. ८४५३) धडक दिली.

Mumbai Goa Highway Car Accident
Bailgadi sharyat : ठाणे, रायगड जिल्ह्यांतील बैलगाडा शर्यतींना बसणार नियमावलीचा झटका

या कार चालकाने, हुसबान अब्दुल हमीद कारविनकर (वय २०, रा. आंबेत, ता. म्हसळा, जि. रायगड), अतिवेगाने कार चालवली, परिणामी ती कंटेनरला जोरात धडकली. या धडकेत ओवेस सज्जाद सरखोत (रा. वणी पो. पुरार, ता. माणगांव, जि. रायगड) आणि सज्जाद अब्दुल सखुर सरखोत (रा. वणी पो. पुरार, ता. माणगांव, जि. रायगड) हे दोघे ठार झाले.

हुसबान अब्दुल हमीद कारविनकर आणि सरजित सज्जाद सरखोत (रा. वणी पो. पुरार, ता. माणगांव, जि. रायगड) हे दोघे जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच कोलाड पोलिस व रेस्क्यू टीम यांनी तात्काळ मदत केली. अपघाताची नोंद कोलाड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. कोलाड पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news