Mumbai-Goa highway mud problem : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य

प्रवाशांच्या जीवाला धोका; जीव मुठीत घेऊन प्रवास
Mumbai-Goa highway mud problem
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्यpudhari photo
Published on
Updated on
कोलाड : विश्वास निकम

मुंबई गोवा महामार्गावरील कामाचा पेच दिवसेंदिवस ठेकेदारांकडून अडचणीचा ठरत असल्याने सरकारचा अंधाधुंदी कारभार आणि ठेकेदाराची मनमानी कारभारामुळे महामार्गांवर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.

यामुळे या महामार्गांवरून प्रवास करणे धोक्याचे झाले असुन आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.तर या महामार्गावरून प्रवास करणारा नागरिक घरी सुरक्षित जाईल याची खात्री देता येत नाही याला जबाबदार कोण? अशी संतप्त प्रतिक्रिया या महामार्गा वरुन प्रवास करणार्‍या प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील चौपदरी करण्याच्या कामाला 18 वर्षे पूर्ण झाले असुन अद्याप हे काम पूर्ण होऊ शकले नाही.

उन्हाळ्यात या महामार्गाचे काम संथ गतीने काम सुरु असते तर पावसाळा सुरु झाल्यानंतर या महामार्गावरील रस्त्याला पडलेले खड्डे भरण्याचे काम सुरु असते.हे खड्डे माती मिश्रित खडीने भरले जात असल्यामुळे प्रचंड पाऊस पडल्यामुळे या महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले जाते यामुळे अनेक वाहने स्लीप होऊन अपघात होत असुन या अपघातात अनेकांचा नाहक बळी जात आहे तर अनेकांना अपंगत्व येत आहे. यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत आहे. याला जबाबदार कोण?

या महामार्गालागत असणार्‍या असंख्य गावाकडे जाण्याचा मार्ग ही अतिशय निष्कृष्ट दर्जाचे करून ठेवल्यामुळे खेडे गावात जाण्यासाठी अनेक अडचणीना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये महामार्गावरील तळवली, वरसगांव, भिरा मार्ग, गोवे, पुई, खांब अशा अनेक ठिकाणी जाणार्‍या येणार्‍या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.या ठिकाणच्या बातम्या वर्तमान पत्रातून आल्या नंतर थातूर मातुर काम केले जाते. परंतु ते काम दोन दिवसांनी पाहता जैसे थे अशीच होते. याला शासनाचे नसलेले ठेकेदारावर वचक असेच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news