रायगडमध्ये 2 हजार 311 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार

जिल्ह्यात निर्माण होणार 2 हजार 865 रोजगार; उद्योजकांसोबत दरमहा होणार बैठक
रायगड
अलिबागमधील जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा गुंतवणूक परिषद 2025 मध्ये संवाद साधताना जिल्हाधिकारी किशन जावळे.Pudhari News Network
Published on
Updated on

रायगड : जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद -2025 कार्यक्रमात रायगड जिल्ह्यात एकूण 2 हजार 311 कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार झालेले आहेत. यातून एकूण 2 हजार 865 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. रायगड जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी तसेच त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्यातील उद्योजकांसोबत दरमहा जिल्हा उद्योगमित्र समितीची बैठक ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाहीर केले.

महाराष्ट्र राज्यातील उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकीच्या संधी, राज्यातील उत्पादने यांची निर्यातवृध्दी तसेच औद्योगिक विकासाकरीता महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाकडून जिल्हा गुंतवणूक परिषद 2025 चे आयोजन अलिबागमधील जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या परिषदेकरिता उद्योग सहसंचालक, कोकण विभाग विजू शिरसाठ, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मोरे, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र जी. एस. हरळय्या, स्टेट बँक ऑफ इंडिया विभागीय व्यवस्थापक विलास शिंदे तसेच जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटनेच्या अध्यक्षासह सुमारे 250 पेक्षा अधिक उद्योजक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व सामंजस्य करारधारकांना पुढील गुंतवणूक कालावधीत शासकीय सर्व कामे प्राधान्याने करण्यात येवून पुढील कालावधीत जास्तीत जास्त रायगड जिल्ह्यात रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल, असे सांगितले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात रायगड जिल्ह्याने प्रथमच 100 टक्के उद्दीष्टपूर्ण केल्याने जिल्हा उद्योग केंद्र व सर्व बँकांचे अभिनंदन केले. रायगड जिल्ह्यातील अस्तित्वातील सर्व उद्योजकांचे 100 दिवशीय कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा उद्योग मित्र समितीच्या अनुषंगाने समस्यांविषयी चर्चा करण्यात आली.

रायगड
रायगड जिल्ह्याने 100 टक्केपेक्षा जास्त उद्दीष्ट यावर्षी साध्य केल्याबद्दल सर्वाचे अभिनंदन केले.Pudhari News Network

100 टक्के उद्दीष्ट पूर्ण केलेल्या बँकाना प्रशस्ती पत्रक

उद्योग सहसंचालक, कोकण विभाग विजू शिरसाठ यांनी जिल्हा गुंतवणूक परिषदेचे उद्देश व एकंदरीत कोकण विभागातील औद्योगिक विकास व विस्तार याबाबत नमूद करुन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमसारख्या शासनाच्या महत्वकांक्षी कार्यक्रमात रायगड जिल्ह्याने 100 टक्केपेक्षा जास्त उद्दीष्ट यावर्षी साध्य केल्याबद्दल सर्वाचे अभिनंदन केले. उद्योग विभागाने मैत्री 2.0 सारखे अत्याधुनिक पोर्टल मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सुरु केल्याने नविन गुंतवणूकदारांना एक खिडकी सुविधा प्राप्त झालेले आहे. काही उद्योजकांना जिल्हाधिकारी, रायगड यांच्या हस्ते सामंजस्य कराराचे वाटप करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेत 100 टक्के उद्दीष्ट पूर्ण केलेल्या बँकाना प्रशस्ती पत्रक देवून गौरविण्यात आले.

जिल्हा गुंतवणूक परिषदेस एमआयडीसी, नगर रचना विभाग, न्यू इंडिया इन्शुरन्स, मैत्री, इंडियन पोस्ट या विभागाचे सादरीकरण करण्यात आले. गुंतवणूक परिषदेकरिता जिल्ह्यातील 225 पेक्षा अधिक उद्योजकासह जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटनाचा सहभाग होता. महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड, जी. एस. हरळय्या यांनी जिल्ह्यातील उद्येागांच्या विकासाकरिता जिल्हाधिकारी यांच्या सुक्ष्म नियोजन व सक्रिय सहभाग असल्याने उद्योगाचा विकास प्राधान्याने होत असल्याचे नमूद करुन विकास आयुक्त (उद्योग) यांच्या मार्गदर्शनाने आजची गुंतवणूक परिषदेचे आयोजन केल्याचे नमूद केले.

225 उद्योजकांचा सहभाग

जिल्हा गुंतवणूक परिषदेस एमआयडीसी, नगर रचना विभाग, न्यू इंडिया इन्शुरन्स, मैत्री, इंडियन पोस्ट या विभागाचे सादरीकरण करण्यात आले. सदर जिल्हा स्तरीय गुंतवणूक परिषदेकरिता रायगड जिल्ह्यातील एकूण 225 पेक्षा अधिक उद्योजकासह जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटनाचा सहभाग होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news