

उरण ः पाऊस तर कधी ऊन अशा सततच्या बदलणार्या वातावरणामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे उरण मध्ये संसर्गजन्य आजार वाढले असून मलेरिया, ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी या सारख्या आजारानी उरणकर हैराण झाले असून ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
पावसाळ्यामध्ये कधी सतत पाऊस तर कधी ऊन पडतो. यामुळे सतत वातावरणात बदल होत असतो. तसेच पावसामध्ये गटारामध्ये तसेच अनेक ठिकाणी पाणी साचले जाते. त्यामुळे मच्छरचे प्रमाण ही वाढले जाते या वाढत्या मच्छरच्या प्रादुर्भावमुळे मलेरिया, डेंगू सारखे आजारात वाढ होत आहेत. तसेच सतत होणार्या वातावरणातील बदलामुळे संसर्गजन्य रोगामध्ये वाढ होत आहे.त्यामुळे ताप ,सर्दी ,खोकला,घसादुखणे असे विविध आजार होत आहेत. यामुळे नागरिक उरण इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय,कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच प्रत्येक गावातील खाजगी रुग्णालयात नागरिक उपचार घेत आहेत.
उरण ग्रामीण रुग्णालयात दिवसाला 225 ते 250 रुग्ण रोज उपचार घेत आहेत.तर प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली येथे ग्रामीण भागातील दिवसाला 125 रुग्ण उपचार घेत आहेत.तसेच आपापल्या परिसरातील गावागावतील खाजगी दवाखान्यात ही मोठ्या प्रमाणात रूग्ण उपचार घेत आहेत. जून ते आतापर्यंत इंदिरा गांधी रुग्णालयात पाच ते साडे पाच हजार रुग्णांनी उपचार घेतले आहेत. कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास तीन हजार रुग्णांनी उपचार घेतले आहे.उरण मध्ये मच्छर चे प्रमाण वाढले आहे.त्यामध्ये मलेरियाचे संशयित रुग्ण 22 रुग्ण आणि डेंग्यूचे संशयित 25 रुग्ण आहेत. ही संख्या कमी असली तरी या बाबत नागरीकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे.
आत्ता सतत वातावरणात बदलत असतो. त्यामुळे आपली रोगप्रतिकारण शक्ती कमी होते. रूग्णाला व्हायरल इन्फेक्शन होऊन आजारी पडतो. अशावेळी घरात न थांबता डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांनी आणखी काळजी घेतली पाहिजे, आपल्या घरासमोरील परिसर स्वच्छ ठेवले पाहिजे कोठेही पाणी साचून न देणे त्यामुळे मच्छर चे प्रमाण कमी होणेस मदत होईल पाणी गाळून आणि उकळवून प्यावे.
डॉ . बी एल काळेल,अधिक्षक, उरण इंदिरा गांधी ग्रामीण रूग्णालय