Modern rice farming : मुरुड तालुक्यात आधुनिक पद्धतीने भातलागवड सुरू

शेतकर्‍यांकडून एसआरटी पद्धतीचा अवलंब; खर्चामध्ये बचत होऊन उत्पादनात होणार वाढ
Modern rice farming
मुरुड तालुक्यात आधुनिक पद्धतीने भातलागवड सुरूpudhari photo
Published on
Updated on
मुरुड जंजिरा ः सुधीर नाझरे

एकेकाळी भाताचे कोठार म्हणून रायगड जिल्ह्या ओळखला जायचा, मात्र कालांतराने औद्योगिकीकरण व लहरी हवामानामुळे लागवडीखालील क्षेत्र कमी होत गेले.

2024-2025 मध्ये रायगड जिल्ह्यात 78700 हेक्टर क्षेत्र भात लागवडीसाठी होते आणि प्रति हेक्टर 2600 किलो इतकी उत्पादकता नोंदवली गेली असुन गेल्या 7/8 वर्षांपासून पणनविभागातर्फे भात उत्पादकांना प्रतिक्विंटल 2387 हमीभाव मिळत आहे प्रोत्साहन म्हणून बोनस देखिल प्रति हेक्टरी 20 हजार रुपये प्रत्यक्ष खात्यात जमा केला आहे. त्यामुळे यंदा भातलागवड क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तवलो जात आहे.

मुरूड कृषी विभागाकडून भात वाणाचे विविध प्रकार आणून उत्पादकता वाढीसाठी शेतकर्‍यांच्या कार्यशाळा, चर्चासत्रे, परिसंवाद आयोजित केले जात असून लागवडीसाठी सगुणा रिजनरेटिव्ह टेकनिक (एसआरटी) या आधुनिक पद्धतीचा अवलंब केला जात आहे. मुरूड तालुक्यांतील आदेश रामचंद्र भोईर, मौजे तिसले यांच्या शेतावर भात पिकाची चारसूत्री पद्धतीने लागवड करण्यात आली. यामध्ये एकूण चार सूत्रांचा अवलंब करण्यात आला.

प्रथम भात पिकांच्या तुसांचा वापर करण्यात आला त्यामुळे भाताला सिलिकॉन या अन्नद्रव्य मिळू शकेल . सिलिकॉनमुळे भात पीक मजबूत होऊन लोळण्याचे प्रमाण कमी होते तसेच खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. तसेच हिरवळीचे खत म्हणून गिरीपुष्प च्या पालाच्या वापर केला गेला परिणामी गिरीपुष्पाच्या पाल्यामध्ये नत्राचे प्रमाण जास्त मिळते जेणेकरून भात पिकाला नत्राचा पुरवठा चांगल्या प्रकारे होऊ शकतो शिवाय गिरीपुष्प च्या पालाचा वापर खेकडा आणि उंदीर यांना प्रतिरोध करण्यासाठी होतो.

या पद्धतीन नियंत्रित लागवड अपेक्षित असल्याने 25 ला * 15 ला अंतरावर नियंत्रित लागवड केल्यामुळे रोपांची संख्या योग्य प्रमाणात राखल्या जाऊन सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहिल्यामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. फुटवा चांगल्या प्रकारे होतो. परिणामी उत्पादनात वाढ घडून यायला मदत होते. अंतिम तः युरिया ब्रिकेटचा वापर हा भात पिकाला खत उपलब्ध करून देतो. युरिया आणि डीएपी यांच्या मिश्रणापासून 2.70 ग्राम आकाराच्या ब्रिकेट / गोळ्या बनवून त्या चार चूडांच्या मध्ये पाच सें. मी. खोलीवर देण्यात येतात, त्यामुळे खतांचा र्‍हास न होता आवश्यकते नुसार हळूहळू भात पिकांला खत उपलब्ध होते.

खताची बचत होऊन उत्पादन खर्च कमी होतो तसेच खता द्वारे होणारे पाण्याचे प्रदूषण टाळता येते. या चार सूत्रांचा अवलंब करून लागवड करण्यात येते. तालुका कृषी अधिकारी मनिषा भुजबळ यांच्या मार्फत मुरुड तालुक्यात ठिक ठिकाणी प्रात्यक्षिक राबविण्यात येत आहेत. जेणेकरून चारसुत्री पद्धतीने लागवड करून उत्पादन खर्चामध्ये बचत होऊन उत्पादनात वाढ होईल आणि आणि त्याचा लाभ शेतकर्‍यांना मिळू शकेल.

भातलागवडीबाबत नियोजन

चार सुत्री पद्धती विषयी रायगड जिल्हा कृषी अधिक्षक वंदना शिंदे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की , 2024-25 या वर्षात चारसूत्री पद्धतीने भात लागवड -400 हेक्टर तर डठढ पद्धतीने -150 हे क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली होती. या सुधारीत पद्धतीचा अवलंब केल्यास पारंपरिक पद्धती पेक्षा 15 ते 50 टक्के अधिक उत्पादन मिळू शकते. प्रति एकरी 2 ते 5 किलो बियाणे लागते. त्यामुळे खर्चात बचत होते. मजबुत रोपांमुळे मुळव्यवस्था छान होते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कीड रोग प्रतिकार शक्ती या पद्धतीमुळे वाढते. यावर्षी 2000 हेक्टरवर चारसूत्री पद्धतीने भात लागवड बाबत नियोजन केल्याची माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news