Raigad Fort Restoration : रायगड प्राधिकरण किल्ल्याच्या संवर्धनासाठी, कोणाच्या सेवेसाठी नाही : प्रविण दरेकर

रायगड पंचक्रोशीतील नागरिकांनी प्राधिकरणाच्या कामाविरोधात मांडल्या तक्रारी
Pravin Darekar News
Pravin Darekar News
Published on
Updated on

ईलयास ढोकले

नाते : भारतीय जनता पार्टीचे नेते नामदार प्रवीण दरेकर यांच्या महाड दौऱ्यामध्ये सावरट हिरकणी वाडी या पंचक्रोशीतील गावांमधील असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. तसेच आमदार प्रविण दरेकर यांच्या प्रयत्नातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी विकास कामांचे उद्घाटन दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील नागरिकांनी रायगड विकास प्राधिकरणाच्या कामांच्या दरेकर यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला. या विभागातील दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन, मी रायगड विकास प्राधिकरण कामांचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच रायगड प्राधिकरण किल्ल्याच्या संवर्धनासाठी असून ते कोणाच्या सेवेसाठी नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या सावरट, हिरकणी वाडी, नेवाळेवाडी, खडकिवाडी, आमडोशी येथील असंख्य कार्यकर्त्यांनी सागर हिरवे व सरपंच चंद्रकांत मोरे यांच्या प्रयत्नातून आ. प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला. यावेळी तरुणांची संख्या लक्षणीय होती. दरम्यान दरेकर यांच्या हस्ते रायगड पंचक्रोशीतील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी जि.प कृषी सभापती वैकुंठ पाटील, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष निलेश थोरे, बिपीन महामुणकर, अमित मोरे, नागेंद्र राठोड, निलेश देवगिरकर, सोपान जामदार, बापू सोनगिरे, महेश शिंदे, अनिल मोरे, संकेत पोरे, चंद्रजीत पालांडे, नाना मोरे, सुनिल सोंडकर, शुभम भावेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पश्चिम बंगालमध्ये इतिहास घडला, जनतेने या ठिकाणी गुंडशाही विरोधात मतदान केले आणि भाजपाला निवडून दिल. तुम्ही देखील कोणाच्याही गुंडगिरीला भिक घालू नका. मी आणि पक्ष तुमच्या सोबत आहे कारण तुम्ही सगळे भाजपा पक्षात नव्हे तर भाजपा परिवारात आला आहात. दरम्यान यावेळी या ठिकाणी जमलेल्या असंख्य नागरिकांनी रायगड विकास प्राधिकरण माध्यमातून रायगड खेड्यातील २१ गावांमध्ये जे काही मूलभूत विकास कामे होत आहेत. त्याबाबत नाराजी व्यक्त करत सदर कामेही निकृष्ट दर्जाची व अनावश्यक ठिकाणी होत असून गरजेच्या ठिकाणी हा निधी वापरला जात असल्याच्या तक्रारी व्यक्त केला.

त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी रायगड विकास प्राधिकरणच्या कामांचा आढावा घेतला असल्याचे यावेळी सांगितले. हिरकणी वाडी येथील झालेल्या पक्ष प्रवेश दरम्यान येथील तरुणांनी भाजपा प्रवेश करून येत्या २०२९ मध्ये महाडमध्ये भाजपचे कमळ फुलवणार, असा विश्वास व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news