Bacchu Kadu | रायगड येथे छत्रपती शिवरायांचे दर्शन घेऊन नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात करणार : बच्चू कडू

शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार बच्चू कडू यांनी किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेतले
Bacchu Kadu after joining Shiv Sena
आमदार बच्चू कडू यांनी किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेतलेPudhari
Published on
Updated on

Bacchu Kadu after joining Shiv Sena

रायगड : शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार बच्चू कडू यांनी किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेत नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात करणार असल्याची घोषणा केली. रायगड हे गर्व आणि अभिमानाचे ठिकाण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बच्चू कडू यांनी रायगडावर भेट देत शिवरायांच्या साक्षीने राज्यातील सर्व समाजघटकांना न्याय देण्यासाठी काम करण्याची शपथ घेतली. “स्वराज्य ज्यांच्या विचारांनी उभं राहिलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालत पुढील वाटचाल करणार,” असे ते म्हणाले.

Bacchu Kadu after joining Shiv Sena
Bacchu Kadu Shiv Sena | बच्चू कडू शिंदेसेनेत; 'प्रहार'मधील कार्यकर्त्यांचा कडाडून विरोध; परभणीत राजकीय भूकंप

यावेळी त्यांनी पुढे सांगितले की, जनतेपर्यंत पोहोचत विविध प्रश्न समजून घेत पुढील राजकीय वाटचाल केली जाईल. तसेच एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संवाद अभियान सुरू करून शेतकरी व मजुरांसाठी नवीन धोरणे राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रसंगी प्रहार संघटनेचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news