

रायगड : रायगड जिल्ह्याला दोन लाख लीटर दुधाचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे आवश्यक दुधापैकी 95 टक्के दूध दुसर्या जिल्ह्यातून मागवावे लागते. साधारण तीन लाख लिटर दुधाची मागणी असताना, जिल्ह्यात केवळ एक हजार लिटर दूध उत्पादित होत आहे. मनुष्यबळाचा अभाव, पाण्याची व हिरव्या चार्याच्या कमतरतेमुळे दिवसेंदिवस हे कमी प्रमाण कमी होत आहे. दूध उत्पादन घटल्याने रायगड जिल्ह्यातील 134 दूध संस्थांसह दोन दूध संघ दिवाळखोरीत निघाले आहेत.
परिणामी जिल्ह्यातील दूधग्राहकांना जिल्ह्याबाहेरून येणार्या विविध दूध संस्थांच्या दुधावर अवलंबून राहावे लागत आहे. शेतकर्यांना जास्तीत जास्त नफा मिळावा, यासाठी सहकार तत्त्वावर चालणार्या दूध संस्था स्थापन करण्यात आल्या; पण त्यातीलही 134 दूध संस्था दिवाळखोरीत गेल्या आहेत. यापैकी अलिबाग तालुक्यातील पाच, पेणमधील 10, पनवेल 19, उरण चार, कर्जत 15, खालापूर पाच, सुधागड 20, रोहा आठ, मुरूड दोन, माणगाव दहा, महाड 26, म्हसळा एक आणि पोलादपूर तालुक्यातील नऊ, तर पेण तालुक्यातील जिल्हा दूध संघ आणि पनवेल तालुक्यातील तालुका दूध संघ दिवाळखोरीत निघाला आहे. सहाः स्थितीत 21 दूध संस्था सुरू असल्याचे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) या कार्यालयाकडून सांगण्यात आले. या 21 दूध संस्थापैकी पेण, पनवेल, खालापूर, माणगाव तालुक्यात प्रत्येकी एक, अलिबाग व महाड तालुक्यात प्रत्येकी दोन, कर्जत व रोहा तालुक्यात प्रत्येकी तीन, तर सुधागड तालुक्यात सात दूध संस्था असल्या, तरी जिल्ह्यात प्रत्यक्षात नऊ संस्थाच दूध सकलनाचे प्रत्यक्ष काम करीत आहेत.
जिल्ह्यात दररोज तीन लाख 16 हजार 247 लिटर दुधाची गरज असताना प्रत्यक्षात एक लाख 74 हजार 698.5 दुधाचे उत्पादन होत असून, एक लाख 41 हजार 548.5 लिटर्स दुधाची जिल्ह्याला अजून गरज आहे.
जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाचा विकास होत नाही, यास विविध कारणे आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे हिरवा चारा असून, उन्हाळ्यात तो मिळेनासा होतो. येथे सुरुवातीच्या कालावधीत चांगल्या संस्था कार्यरत होत्या, परंतु त्या टप्प्याटप्प्याने बंद पडत गेल्या. आता काही मोजक्याच संस्था दुधाचे संकलन करतात. दररोज दुधाची मागणी वाढत असताना येथील दुधाचे उत्पादन घटत चालले आहे.
सुदर्शन पाडावे, दुग्ध विकास अधिकारी, रायगड
जिल्ह्यातील चार महिने पाणीटंचाईचे असल्याने या कालावधीत जनावरांनाही टंचाई जाणवत असते. या चार महिन्यांत दुधाचे उत्पन्न कमी होत असल्याने ते शेतकर्यांना न परवडण्यासारखे असते. यावर मात करत काही गावातील शेतकर्यार्यांनी दुग्ध व्यवसाय कार्यरत ठेवला आहे; परंतु या व्यवसायातून येथील पाच टक्केही मागणी पूर्ण होऊ शकत नाही.
सध्या जिल्हा दुग्ध विकास विभागात पाच कर्मचारीच कार्यरत आहेत. दुग्ध विकासाला जिल्ह्यात कमी संधी असल्याने या विभागाचे पशुसंवर्धन विभागात विलीनीकरण केले जाणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाने अध्यादेश काढला असून, टप्प्याटप्प्याने विलीनीकरण केले जात आहे. त्यामुळे हा दुग्ध विकास विभाग काही दिवसांनी इतिहासजमा होणार आहे. सध्या या विभागाचा कारभार प्रभारी अधिकार्यांवर सोपवण्यात आलेला आहे.
नवी मुंबई परिसरात दुधावर प्रक्रिया करणारे उद्योग आहेत. या ठिकाणी जादा उत्पादित होणार्या दुधावर प्रक्रिया केली जाते. त्याचबरोबर मुंबईसारखी मोठी बाजारपेठ जवळच असल्याने वाहतुकीचा खर्च कमी आहे. यासाठी रायगड जिल्ह्यात दुग्ध विकासासाठी खूप चांगली संधी होती, परंतु येथील स्थानिकांचे शेतीबरोबर दुग्ध व्यवसायाकडेही दुर्लक्ष झाले. सध्या फक्त खालापूर आणि महाड येथे दोन संस्था कार्यरत आहेत.