Matheran tribal villages road issue : रस्ते देता का रस्ते...आदिवासींचा टाहो

माथेरानच्या पायथ्याच्या अनेक वाड्या आजही रस्त्याविनाच
Matheran tribal villages road issue
रस्ते देता का रस्ते...आदिवासींचा टाहोpudhari photo
Published on
Updated on

नेरळ ः माथेरानच्या पायथ्याशी गेले अनेक वर्षांपासून आदिवासी वाड्या वसलेल्या आहेत. मात्र स्वातंत्र्य काळापासून या आदिवासी पाड्यांना अद्यापही रस्त्यापासून वंचित आहेत. गेले अनेक वर्षापासून हे आदिवासी वाढीतील लोक आपल्या श्रमदानातून रस्ता बनवत असतात मात्र हा रस्ता दिवाळीनंतर बनवला जातो. मात्र या रस्त्याला महेश विरले यांनी जेसीपी लावून माती टाकली. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली जोराचा पाऊस असल्यामुळे हा धनगर वाडा, बेकरेवाडी अस्सल वाडी, नाण्याचा माळ या आदिवासी वाड्यांना जोडणा-या रस्त्याची दूरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे या आदिवासी वाड्यातील लोकांना आपली स्वतःचे वाहन नेण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

माथेरानच्या पायथ्याशी असणाऱ्या आदिवासी वाड्यांना कित्येक काळापासून रस्ता नाही. मात्र हे आदिवासी वाडीतील लोक आपल्या श्रमदानातून रस्ता करत असतात. मात्र यावर्षी हा रस्ता सरपंच महेश विरले यांच्या माध्यमातून करण्यात आला. मात्र या रस्त्यावर दिवाळीनंतर मातीचा भराव टाकण्यात आला त्यानंतर मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली.

Matheran tribal villages road issue
Avinash jadhav : महाड यूपीमध्ये आहे की बिहारमध्ये,आरोपींना अटक न केल्यास महाड बंद

मुसळधार पाऊस पडल्याने या रस्त्याची दूर अवस्था आपल्याला पाहायला मिळाली. या रस्त्यात मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने दुचाकी स्वार व पायी जाणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात चिखल असल्याने या ठिकाणी वाहन चालवणे देखील अवघड जात आहे.

चालणेही झाले मुश्कील

या रस्त्याला कुठल्या प्रकारे वाहन जात नसल्याने या ठिकाणच्या रस्त्याची दूर अवस्था पाहायला मिळत आहे. या रस्त्यावर जेव्हापासून माती टाकण्यात आले. त्यानंतर येथील आदिवासी लोकांचे नाहक हाल आपल्याला पाहायला मिळालेत मात्र माती टाकल्यानंतर कुठलाही राजकीय नेता या रस्त्याकडे डोकावला नाही. मात्र या रस्त्याची दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे.

Matheran tribal villages road issue
Zilla Parishad teacher payment : कंत्राटी शिक्षकांना अखेर मिळाले वेतन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news