

नेरळ : आनंद सकपाळ
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, दहीहंडी व रविवार अशा सलग तीन दिवस लागून सुट्टयाअसल्याने, माथेरान हे पर्यटकांनी बहरले आहे. तर माथेरान घाट रस्ता हा जाम झाल्याचे तसेच नेरळ रेल्वे स्थानकाबाहेर माथेरानकडे जाण्यासाठी आलेल्या पर्यटकांची नेरळ-माथेरान टॅक्सी स्टँडवरती झालेली गर्दी व टॅक्सीकरीता लावलेल्या रांगा पाहता नेरळला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र अनुभवास मिळत होते.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, दहीहंडी व रविवार अशा सलग तीन दिवस लागून सुट्टया असल्याने व मुंबई पुणे आदी शहरी भागात व जिल्हा तसेच राज्यांना जवळचे पर्यटनस्थळ म्हणून या वीकेंडला पर्यटकांनी जगप्रसिद्ध थंड हवेचे व निर्सगरम्य वातारण असलेल्या माथेरानला पंसती दिली असल्याने, आज माथेरान हे पर्यटकांनी बहरले आहे. तर माथेरानमध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळत आहे. तर दस्तुरी नाका येथील मुख्य माथेरान प्रवेशद्वारावर प्रवेश शुल्काच्या पावतीकरिता देखील पर्यटकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
तसेच माथेरानला जाण्यासाठी एकमेव मार्ग हा नेरळमधून असल्याने व मध्य रेल्वेने यायचे झाल्यास नेरळ रेल्वे स्थानक येथे उतरावे लागत असल्याने, रेल्वेने आलेल्या पर्यटकांना माथेरानकडे जाण्यास टॅक्सी हा एकमेव पर्याय असल्याने, नेरळ रेल्वे स्थानकांबाहेरील असलेल्या टॅक्सी स्टेंड ते खांडा येथील तुलशी पॉईंट या इमारती पर्यंत साधारण ३०० ते ४०० मीटर अशी टॅक्सीकरिता पर्यटकांची लागलेली रांग व नेरळ रेल्वे स्थानकाबाहेर पर्यटकांची गर्दी झाल्याने, नेरळला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र अनुभवयास मिळत होते. तर मोठ्या प्रमाणात पर्यटक हे माथेरानमध्ये जाण्यासाठी आल्याने, एकमेव असलेला माथेरान घाट रस्ता हा जाम झाल्याची परस्थिती निर्माण झाली असल्याने, पर्यटकांवर घाट रस्त्यात बराच वेळ खोळंबून राहण्याची परस्थिती ओढावली आहे. तर आज आलेल्या पर्यटकांची संख्या व गर्दी पाहता माथेरानमध्ये साधारण ३० ते ४० हजार पर्यटक आले असल्याचा अंदाज हा वर्तविला जात आहे.