Matheran Rain | माथेरान शहराला पावसाने झोडपले

पावसात ही पर्यटकांचा उत्साह
Matheran Rain
माथेरान शहराला पावसाने झोडपलेpudhari photo

माथेरान ः माथेरानमध्ये मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच असून सोमवारी दिवसभर सुरू असलेल्या वारा व पावसाने माथेरानला झोडपले असून मंगळवारीही पावसाने उसंत घेतलेली नाही, परंतु अशा पावसात ही पर्यटकांचा उत्साह ओसंडून वाहत असून आठवड्याचे मधले दिवस असूनही पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे.

माथेरानमध्ये दोन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत असून सोमवारी रायगड जिल्ह्यातील सर्वात जास्त पावसाची नोंद माथेरानमध्ये झाली असून तब्बल 188:4 मिमी पाऊस झाला आहे. या पावसाबरोबर जोरदार वारे ही असल्याने झाडे वा झाडाच्या फांद्या पडण्याचे काही तुरळक घटना घडल्या आहेत परंतु जोरदार पावसाने येथील अनेक घरे हॉटेल्स व दुकानांमध्ये झरे सुरू झाले असून त्याचे पाणी काढण्यासाठी सातत्याने मोटर लाऊन पाणी बाहेर फेकण्याची काम सुरू आहे. विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासास सामोरे जावे लागत आहे.

मागील काही दिवसांपासून सतत 100 मिमीच्या आसपास पाऊस कोसळत असून अशा पावसात ही पर्यटक मात्र माथेरानमध्ये हजेरी लावत आहेत .15 जून नंतर खर्‍या अर्थाने पावसास सुरुवात झाली होती व तेव्हा पासून आतापर्यंत किमान दोन लाखांपेक्षा अधिक पर्यटकांनी माथेरानला भेट दिली असून हा आतापर्यंतचा उचांक्की आकडा आहे. येथे जोरावर पाऊस असला तरी माथेरानची मिनी ट्रेन सुरळीत सुरू असल्याने पर्यटकांची गर्दी रेल्वे स्थानकात दिसून येत आहे. तर ई रिक्षांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news