

माथेरान ः माथेरान मधील नगरपालिका मालिकेच्या भूखंड क्रमांक 93 यावरील अतिक्रमन पालिकेने पोलीस बंदोबस्तामध्ये हटवले आहे. यामुळे हा परिसर बकालीकरनापासून मुक्त होणार असून लवकरच या ठिकाणी सुसज्ज वाहन स्थळ होणार असल्याने माथेरान मधील घाटातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे.
माथेरान मध्ये मागील काही वर्षांमध्ये पर्यटकांचा प्रचंड ओघ वाढला आहे त्यामुळे येथील घाट रस्ता अपुरा पडत होता त्याचबरोबर येथे असलेली मर्यादित वाहन स्थळ व्यवस्था हा मोठा जडील प्रश्न निर्माण झाला होता परंतु माथेरान मधील स्थानिक नागरिकांनी गेल्या दहा वर्षापासून येथील भूखंड क्रमांक 93 हा वाहन स्थळाकरिता शासनाकडे मागितला होता परंतु त्यास शासनामार्फत सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता परंतु स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी केलेल्या कारवाईनंतर वाहन स्थळ होणार अशा आशा निर्माण झाली आहे .
अनेक वर्षापूर्वी माथेरानमध्ये मालवाहतूक घोड्यांचा व्यवसाय नेरळ येथील काही व्यावसायिक करत असत संध्याकाळ होताच हे घोडे पुन्हा नेरळला जात होतो सकाळी पुन्हा येऊन आपला व्यवसाय करीत असाल परंतु मागील काही वर्षांमध्ये नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे किंवा राजकीय हस्तामुळे त्यांनी शासकीय भूखंड क्रमांक 93 या ठिकाणी आपले घोडेबांधन्यास सुरुवात केली होती व काही काळानंतर प्रवासी घोडे ही या ठिकाणी बांधले गेले व तेथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले गेले हा भाग वनराईने नटलेला होता परंतु आता घोड्यांच्या वाढत्या राबतामुळे हा परिसर उजाड झाला आहे त्यामुळे या कारवाईचे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी माथेरानचे पर्यटन वाढण्याकरिता काही निर्णय घेताना पुढाकार घेतला आहे.
वाहन तळावर घोड्यांचा तबेला
या भूखंडावर मालवाहतूक घोडे व प्रवासी घोडे यांचा कब्जा असल्यामुळे वाहन स्थळाचा प्रश्न अधिक जाटील झाला होता त्याचप्रमाणे या परिसरात घोडाच्या मलमूत्र टाकत असल्याने येथील वनसंपदा ही नष्ट झाली होती ज्यामुळे पर्यावरणालाही धोका निर्माण झाला होता ज्यामुळे स्थानिक नागरीक सातत्याने या ठिकाणी कारवाई व्हावी अशी मागणी करीत होते कालच्या या कारवाईमुळे या भूखंडावर किमान 500 गाड्यांचे वाहन स्थळ निर्माण होणार आहे ज्यामुळे माथेरानमध्ये सातत्याने भेडसावणारा वाहन स्थळ प्रश्न कायमचा निकाली लागणार आहे याचा थेट फायदा येथील पर्यटन वाढीस होणार आहे.