

नेरळ : आनंद सकपाळ
माथेरान नगरपरिषदेच्या नगरसेवकपदासाठी एकूण 46 अर्ज राहिले असून नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवारासह एकूण 21 जागेसाठी 48 उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत. 2 डिसेंबर रोजी माथेरान नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक होणार असून, 72 उमेदवारांनी आपले नामनिर्देशित अर्ज दाखल केले होते त्यापैकी 24 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने काही प्रभागात दुरंगी आणि काही प्रभागात तिरंगी लढत होणार आहे. चार प्रभागात सहा अपक्ष उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत.
माथेरानची सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर महायुती विरुद्ध शिवराष्ट्र पॅनल यांनी कंबर कसून प्रचारात उडी घेतली असून अपक्षही कुठे मागे दिसत नाही.एकूण चार प्रभागात सहा अपक्ष उमेदवारांनी उडी घेतली असून प्रत्येकाच्या दारात भेट देऊन प्रचार केला जात आहे.प्रभाग क्र.1 मधून अपक्ष उमेदवार माजी नगरसेविका सुनीता संतोष आखाडे,प्रभाग क्र.4 मधून माजी नगराध्यक्ष गौतम गायकवाड यांचे पुत्र प्रशांत गौतम गायकवाड व माजी नगरसेवक संतोष लखन, प्रभाग क्र.8 मधून माजी नगरसेवक दिनेश सुतार व रेखा बेलोसे तसेच प्रभाग क्र.10 मधून संजय भोसले हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
तर महायुतीकडून नगराध्यक्षसह 21 अर्ज व शिवराष्ट्र पॅनल कडून नगराध्यक्षसह 21 अर्ज असून, प्रभाग क्र.1, 4, 8 आणि 10 प्रभाग वगळता इतर प्रभागात दुरंगी लढत होणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र ठाकूर यांनी दिली आहे. निवडणूक लागल्यानंतर एकूण 72 अर्ज दाखल झाले त्यातील 24 अर्ज हे मागे घेण्यात आले. नगरसेवकपदासाठी एकूण 46 अर्ज राहिले असून दोन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह एकूण 21 जागेसाठी 48 उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत.
नगरसेवक पदांसाठी 46 जण रिंगणात
निवडणूक लागल्यानंतर एकूण 72 अर्ज दाखल झाले त्यातील 24 अर्ज हे मागे घेण्यात आले. नगरसेवकपदासाठी एकूण 46 अर्ज राहिले असून दोन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह एकूण 21 जागेसाठी 48 उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत.