

नेरळ ( रायगड ) : नेरळ माथेरान घाटरस्ता दर सुट्टीला म्हणजेच शनिवार आणि रविवार तसेच सलग सुट्ट्या लागून आल्यांनतर वाहतूक कोंडीत सापडत असतो. यावर्षी ख्रिसमस आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची गर्दी माथेरानमध्ये आले आहेत, मात्र नेरळ माथेरान घाटरस्ता वाहतूक कोंडीत सापडला नाही.
रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी जिल्ह्यात वाहतूक कोंडीचे नियोजन केल्याने माथेरानमध्ये पायथ्यशी हुतात्मा चौकात वाहतूक पोलिसांनी केलेले योग्य नियोजन यामुळे घाटरस्ता जाम झाला नाही. दरम्यान माथेरान मध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असून सतत गर्दी होत असल्याने दस्तुरी येथील वाहनतळ फुल्ल झाल्यानंतर खासगी वाहने नेरळ येथे पार्किंग करून ठेवण्यास सांगितले जात आहे.
जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवर जनावरे रस्त्याचा अभ्यास करून वाहतूक कोंडी होणारी स्थाने निश्चित केली आणि त्यानुसार ख्रिसमस ते नवीन वर्षाचा पहिला दिवस या कालावधीत मोठ्या प्रमाणावर वाहतूक पोलिसांचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्ह्याचे वाहतूक भुजबळ यांना सर्वाधिकार देत वाहतूक कोंडीत कोणी अडकणार नाही यावर नियोपन करण्याचे धोरण निश्चित केले.
त्यानुसार माथेरान या पर्यटन स्थळे जाणारे पर्यटक यांची संख्या आणि खासगी वाहने घेऊन जाणारे पर्यटक यांची संख्या लक्षात घेऊन दस्तुरी नाका शिवाय नेरळ येथे कल्याण कर्जत रस्त्यावर माथेरान नाका असलेल्या हुतात्मा चौकात वाहतुकीचे नियोजन करणारे पॉईंट बनवले.
पोलीस अधीक्षकांचे नियंत्रण
माथेरान हे पर्यटन स्थळ ख्रिसमस आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी येणारे पर्यटक यांच्यामुळे पर्यटकांच्या गर्दीन फुल्ल होत असते. त्यात माथेरान मध्ये येणारी वाहने मोठ्या संख्येने आल्यावर वाहतूक कोंडी नेरळ माथेरान घाटरस्त्यात होत असते. त्यानंतर वाहतूक कोंडीत दोन तीन तास पर्यटकांची वाहने अडकून पडण्याच्या घटना यावर्षी दर शनिवार आणि रविवार घडत होत्या. त्यात सलग सुट्ट्या लागून आल्यानंतर देखील पर्यटकांची वाहने अडकून पडत असल्याने जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी यावर ठोस उपाययोजना करण्यावर भर दिला.