e-rickshaw breakdown issue : माथेरानमधील ई-रिक्षा बंद पडण्याचे वाढते प्रमाण

बंद रिक्षांमुळे पर्यटकांचा तासंतास खोळंबा; खराब रस्त्यांमुळे रिक्षा होतात सतत नादुरुस्त
e-rickshaw breakdown issue
माथेरानमधील ई-रिक्षा बंद पडण्याचे वाढते प्रमाणpudhari photo
Published on: 
Updated on: 

माथेरान : मिलिंद कदम

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर येथील ई रिक्षा सेवा सुरूच राहणार हे आता पक्के झाले आहे. परंतु या रिक्षा सातत्याने बंद पडण्याच्या प्रमाणाची आता वाढ झालेली असून या रिक्षा दुरुस्ती करिता लागणारी यंत्रणाच माथेरानमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे फक्त वीस रिक्षांमध्ये जेमतेम आठ ते दहाच रिक्षा रस्त्यावरती सुरू असल्याने रिक्षांमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना अर्धा ते एक तास वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे रिक्षाचा सुरू केल्या परंतु देखभालीचे काय असा प्रश्न आता समोर येत आहे.

माथेरानमध्ये ई रिक्षा सुरू झाल्यापासून येथील वाहतूक व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल घडलेला दिसून आला. वाहतूक पर्यायाला पर्यटकांकडून पहिली पसंती मिळत असल्याने हा व्यवसाय भरभराटीला आल्याचे दिसत आहे. परंतु येथील रस्त्यांवर सेवा देताना या रिक्षांचे पाटे वारंवार तुटत आहेत. या रिक्षा बंद पडण्याच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. वीस रिक्षा प्रत्यक्षात सुरू आहे त्यातील शालेय विद्यार्थ्यांना प्राथमिकता देण्याचे धोरण असल्याने 15 रिक्षा या विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी धावत असतात त्यामुळे प्रवासी सेवेकरिता फार कमी रिक्षा उपलब्ध असतात. ज्यामुळे प्रवाशांना तासंतास रिक्षाची वाट पाहत तात्काळत उभे राहावे लागत आहे.

या ठिकाणी रोज सात ते आठ रिक्षा ना दुरुस्त असल्याचे रिक्षा चालकांचे म्हणणे असून शाळा सुरू असल्या नंतर विद्यार्थ्यांना प्राधान्य दिल्यामुळे रस्त्यावर प्रत्यक्षात फारच कमी रिक्षा मिळत असतात.

माथेरानमध्ये या रिक्षांशिवाय कोणतेही वाहन उपलब्ध नसल्याने येथे वाहन दुरुस्तीचे कोणते साधन उपलब्ध झालेले नाही त्यामुळे या रिक्षा दुरुस्ती करिता नेरळ येथे घेऊन जाव्या लागतात परंतु बॅटरीवर चालणार्‍या रिक्षांचे सुट्टे भाग लवकर उपलब्ध होत नसल्याने येथे रिक्षा अनेक दिवस उभ्या राहत असतात असे रिक्षा चालकांचे म्हणणे आहे त्यामुळे माथेरानकरांना रिक्षा सुरू होऊ नये अपुर्‍या रिक्षा संख्या अभावी तात्काळ उभे राहावे लागत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ई रिक्षा सुरू करण्याचा आदेश देताना सहा महिन्यांमध्ये सर्व गरजूंना ही रिक्षा शासनाने उपलब्ध करून द्याव्या असा आदेशच दिला होता परंतु अद्याप पर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली पाहावयास मिळत नाही. जेव्हा हा प्रकल्प सुरू झाला त्यावेळेस नगरपालिकेने स्वतःच्या मालकीच्या 7 ई रिक्षा घेतल्या होत्या त्या आताही धुळखात पडून आहे कोर्टाचे स्पष्ट आदेश असतानाही या रिक्षा अद्यापी रस्त्यावर आलेल्या नाहीत त्यामुळे पालिका प्रशासन या देशात किती गांभीर्याने घेते हे लक्षात येते असे रिक्षा चालकांचे म्हणणे आहे.

येथील रस्त्यांवरील क्ले पेव्हर ब्लॉकची झालेली दुरावस्था हीच या रिक्षांच्या नादरुस्त होण्यामागील मुख्य कारण असल्याचे ई रिक्षा चालकांचे म्हणणे असून कोर्टाने स्पष्ट आदेश दिल्यानंतरही या रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने पुन्हा एकदा नगरपालिकेकडेच बोट दाखवले जाते.

राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाकडे ई रिक्षाच्या पायलट प्रोजेक्टची मागणी केली होती. उद्देश हाच होता, कोणत्या मॉडेलच्या ई रिक्षा माथेरानच्या तीव्र चढउताराच्या रस्त्यांवर धावू शकतात हे पाहणे होते. सध्या बजाज, कायन्याटिक व एकसाईडसारख्या कंपन्या एल 5 मॉडेलच्या असल्याने या कंपनीच्या ई रिक्षांच्या ट्रायल्ससाठी सनियंत्रण समितीने परवानगी द्यावी.

सुनील शिंदे, याचिकाकर्ते, माथेरान

सकाळी सहा वाजता कॉलेजला जाताना ई-रिक्षा लवकर उपलब्ध झाल्यास आम्हाला नेरळ-माथेरान बस मिळते, त्यामुळे आम्ही वेळेवरती कॉलेजला पोहोचतो परंतु काही वेळा अपूर्ण रिक्षांमुळे आमची बस चुकल्यास त्या दिवशी कॉलेजला जाता येत नाही.

मानव कदम, विद्यार्थी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news