

रायगड : पुढारी वृत्तसेवा
धाटाव औद्योगिक परिसरातील एका कंपनीच्या गोडाऊनमध्ये रॉ मटेरियल ठेवले होते. या साहिल्याला वाढत्या उष्णतेमुळे अचानक आग लागली.
दुपारी एक वाजून 16 मिनिटांनी या गोडाऊनमध्ये आग लागली. ताबडतोब धाटाव औद्योगिक अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पाच मिनिटात दाखल झाल्या आणि बऱ्यापैकी आग आटोक्यात आणण्यात आली.