Raigad Heavy Rain | रोहा कोलाड मार्गावर सुदर्शन कॉलनीजवळ वडाचे भलेमोठे झाड कोसळले; वाहतूक ठप्प, दुचाकींसाठी मार्ग केला मोकळा

Published on
Updated on

Raigad Heavy Rain गेली चार दिवस सतत मुसळधार पडत असलेल्या पावसामुले रोहा कोलाड मार्गावर रोह्यातील सुदर्शन कॉलनी परिसरात मोरया चायनीजजवळ रविवारी सायंकाळच्या सुमारास भलेमोठे वडाचे झाड अचानक रस्त्यावर कोसळल्याने रोहा-कोलाड मुख्य रहदारीच्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तर झाड रस्त्याच्या मध्यभागी आडवे पडल्यामुळे मोठी अवजड व चारचाकी वाहने, बस आणि मालवाहू वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून केवळ दुचाकी वाहनांसाठी काही श्रमदात्याने झाडाच्या फांद्या बाजूला करून दुचाकी स्वार अत्यंत सावधगिरीने मार्ग काढत ये जा करत आहेत .

सदरच्या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्ता बंद झाल्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. परंतु सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी घडली नाही.तर मार्गावर कोसळले झाड काढण्यासाठी अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news