Konkan Mango Farming: फेब्रुवारीच्या उष्णतेचा आंबा पिकाला फटका; फळगळ वाढण्याची चिन्हे, शेतकऱ्यांना तज्ज्ञांचा इशारा

तापमानवाढ, कोरडे वारे आणि रोगप्रादुर्भावामुळे उत्पादन धोक्यात; योग्य पाणी व्यवस्थापन व फवारणीचा सल्ला
Konkan Mango Farming
Konkan Mango FarmingPudhari
Published on
Updated on

सुधागड : संतोष उतेकर

फेब्रुवारी महिना सुरू होताच वातावरणातील तापमानाचा पारा वाढू लागला आहे. याचा थेट फटका आंबा पिकाला बसण्याची शक्यता निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी लहान फळांची गळ (फळगळ) सुरू झाली आहे. आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी हे नुकसान टाळण्यासाठी आतापासूनच तज्ज्ञांच्या सल्ल्याने बागेचे व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Konkan Mango Farming
Panvel Municipal Corporation: पनवेलमध्ये जनसेवेचा नवा आदर्श; नगरसेविका रुचिता लोंढे यांचा संपूर्ण मानधन ‘महापौर सहाय्यता निधी’त वर्ग करण्याचा निर्णय

आंब्याच्या एका मोहराच्या दांडीवर 75 ते 95 टक्के नर फुले आणि 5 ते 25 टक्के द्विलिंगी फुले असतात. मोठ्या प्रमाणावर होणारी फळधारणा झाडाला पेलवत नाही, त्यामुळे नैसर्गिकरित्या काही प्रमाणात फळगळ होतेच. मात्र, याव्यतिरिक्त भुरी आणि करपा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव, तुडतुड्यांचा वाढता ॲटॅक आणि अन्नद्रव्यांची कमतरता यामुळे ही गळती अधिक तीव्र होते.

Konkan Mango Farming
Mahad Poladpur: महाड-पोलादपूरमध्ये राष्ट्रवादी-भाजपला धक्का; जाहीर प्रचार टाळल्याचा परिणाम की स्थानिक समन्वयाचा अभाव कारणीभूत?

फेब्रुवारीपासून दिवसांचे तापमान वाढू लागल्याने हवेत कोरडे आणि उष्ण वारे वाहू लागतात. यामुळे लहान फळांमधील ऑक्सिजन या संजीवकाचे प्रमाण कमी होते, परिणामी कोवळी फळे गळून पडतात. ज्या जमिनी हलक्या आहेत, तिथे पाण्याचा ताण पडल्यास झाडावर नगण्य फळे शिल्लक राहण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वेळेवर केलेली कीड आणि रोग नियंत्रण फवारणी तसेच संजीवकांचा वापर यंदाच्या हंगामातील आंब्याचे उत्पादन शाबूत ठेवण्यास मदत करेल असे मत पालीतील कृषी तज्ज्ञ अमित निंबाळकर यांनी व्यक्त केले.

Konkan Mango Farming
Panvel Robbery | रिक्षाचालकाचा कर्ज फेडण्यासाठी प्रवासी महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला: दागिन्यांसह रोकड लुटली; ४८ तासांत आरोपी जेरबंद

उत्पादन टिकवण्यासाठी हे करा उपाय :

पाणी व्यवस्थापन: केवळ ठिबक सिंचनावर अवलंबून न राहता, बागेत गारवा टिकवण्यासाठी काही वेळा मोकळे पाणी सोडावे. यामुळे हवेतील आर्द्रता टिकून राहते.

आच्छादन: जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी झाडाखाली उसाचे पाचट किंवा वाळलेल्या पालापाचोळ्याचा 6 इंची थर द्यावा. वाळवी रोखण्यासाठी त्यात लिंडेन पावडरचा वापर करावा.

हवा रोधक झाडे: बागेच्या संरक्षणासाठी शेवरी किंवा रेनट्री यांसारख्या झाडांची लागवड करावी, जेणेकरून उष्ण वाऱ्यांपासून बागेचे रक्षण होईल.

खतांचा वापर: नत्राचा दुसरा हप्ता आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news