Mangaon storm damage: पाटणूस, भीरा, विळे परिसरात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याचे थैमान

वाऱ्याचा वेगइतका प्रचंड होता की रस्त्यावर व अन्य ठिकाणी झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत.
Mangaon storm damage
Mangaon storm damagePudhari
Published on
Updated on

माणगाव: माणगाव तालुक्यातील पाटणूस, विळे, भिरा परिसरात गुरुवारी अचानक आलेल्या वादळी वारा व पाऊस याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. वाऱ्याचा वेगइतका प्रचंड होता की रस्त्यावर व अन्य ठिकाणी झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत.

रस्त्यावर झाडें पडल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. पाटणूस गावात अनेकांच्या घरांचे छप्पर उडाले आहेत परस बागेतील आंब्यांच्या झाडावर असलेले आंबे वाऱ्याने खाली पडाल्यामुळे पिकण्यासाठी तयार असलेले आंबे खराब झाले आहेत.

Mangaon storm damage
‌Aaple Sarkar Portal Issue: ‘आपले सरकार पोर्टल‌’चा तांत्रिक खेळखंडोबा सुरूच

आदिवासी वाडीत अनेकांच्या घरांची दैना झाली आहे. पावसाळ्या पूर्वी घरावरील छप्पर (पत्रे) काढून घर साफ करण्यासाठी काम सुरु असताना नेमका त्याच वेळी पाऊस आल्याने घरातील वस्तू खराब झाल्याने नुकसान झाले आहे.

काही ग्रामस्थांच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. झाडे जमीन दोस्त झाली आहेत. प्रशासनाने नुकसान ग्रस्त ग्रामस्थांच्या घरांची व बागांची पहाणी करून ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई द्यावी ही ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news