Mangaon murder case Raigad : आरोपीला अटक करा नाहीतर रस्त्यावर उतरणार

माणगावमधील सर्वपक्षीय नेत्यांचा इशारा; लोणेरेतील तरुणी हत्त्या प्रकरण
Mangaon murder case Raigad
Mangaon murder case Raigadpudhari photo
Published on
Updated on

गोरेगांव : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे लॉजवर एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली असून येत्या 24 तासात आरोपीला अटक न झाल्यास माणगाव तालुका बंद करण्याचा इशारा सर्वपक्षीय नेत्यांकडून देण्यात आला आहे.

मृत तरुणीच्या श्रद्धांजली सभेवेळी अन्यायाविरोधात निषेध नोंदवण्यासाठी आणि पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत तालुका बंदचा निर्णय घेतला आहे. लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सी या लॉजवर एका तरुणीची अत्याचार करून हत्या करण्यात आली होती यातील असणाऱ्या आरोपीने तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला करून पलायन केले आहे.

Mangaon murder case Raigad
Palghar Worker Torture: झाडाला उलटे टांगून जखमांवर तिखट मसाला चोळण्याचा प्रकार; वीटभट्टी मालकाचा मजुरावर अमानुष अत्याचार; दोन आरोपींना अटक

सदर फरार आरोपीचा गोरेगाव पोलीस आणि फॉरेन्सिक टीमकडून तपास देखील सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी जो पर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत तोपर्यंत गोरेगांव विभागातील नागरिक शांत बसणार नाहीत वेळ आली तर रस्त्यावर उतरून गोरेगांव परिसर माणगांव तालुका बंद करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. त्या सर्व सामान्य गरीब कुटुंबातील तरुणीला न्याय मिळवून दिल्याशिवाय गोरेगाववासीय शांत बसणार नाहीत. फरार असणाऱ्या संशयित आरोपीने रत्नागिरीचा पत्ता वापरून रूम बुक केल्याची माहिती जरी असली तरीही आरोपी अद्यापही मोकाट फिरत असल्याने जनतेमध्ये या घटनेनंतर तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

Mangaon murder case Raigad
Amravati Crime | भातकुलीत अपघाताचा बनाव : जेवणाच्या कारणावरून अल्पवयीन मुलाचा धारदार शस्त्राने खून केल्याचे उघड; जखमी आरोपी रुग्णालयात

या वेळी नरेश अहिरे, विकास गायकवाड, प्रमोद घोसाळकर, अरुण चाळके, नंदू शिर्के, बापू सोनगिरे, मुख्तार वेळासकर, दिनेश हरवंडकर, स्वाती करकरे, स्वीटी गिरासे प्रदीप गोरेगांवकर या प्रमुख नेत्यांसह व्यापारी, नागरिक, महिला वर्ग अनेक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

  • या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस प्रशासनाकडून देखील कसून तपास केला जात असल्याचे सांगितले जात असले तरी आरोपीला अजून अटक का होत नाही यामागे कोणती राजकिय शक्ती वापरली जात आहे का? फरार आरोपीचे कोणी राजकीय वरदहस्त आहेत का ? आरोपी कोणाचा नातेवाईक आहे का असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news