Mangaon Bypass Work: माणगाव बायपासच्या कामाला अखेर निर्णायक गती; आठ गर्डर बसविण्याचे काम पूर्ण

दुसऱ्या मार्गिकेचे गर्डर १ ते ४ नोव्हेंबरदरम्यान बसविणार
Mangaon Bypass Work
Mangaon Bypass WorkPudhari
Published on: 
Updated on: 

अरुण पवार

माणगाव: मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव बायपासचे काम गेली अनेक वर्षे रखडल्याने माणगावकरांसह कोकणातून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका, वेळेचा अपव्यय आणि बाजारपेठेतील दैनंदिन वाहतुकीचा ताण यामुळे माणगाव शहरातील नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत.

Mangaon Bypass Work
Vadshet Vave Irrigation Project: श्रीवर्धनच्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सिंचन योजनेसाठी १४० कोटींची मंजुरी

मात्र आता या दीर्घ प्रतीक्षेला पूर्णविराम मिळण्याच्या आशा पुन्हा एकदा बळावल्या आहेत. माणगाव बायपासच्या कामाला अखेर निर्णायक गती मिळाली असून, कोकण रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेवरील आठ गर्डर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.

आता दुसऱ्या मार्गिकेवरील गर्डर बसविण्याचे काम १ ते ४ नोव्हेंबरदरम्यान हाती घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या कामासाठी नियोजित वेळापत्रकानुसार पहाटे ४.३० ते सकाळी ९.३० या वेळेत काम करण्यात येणार असून, या कालावधीत कोकण रेल्वेची कोणतीही गाडी ये-जा करणार नाही.

त्यामुळे रेल्वे वाहतुकीला अडथळा न आणता महत्त्वाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

१५ फेब्रुवारी पर्यंत बायपास सुरू करण्याचे नियोजन- माणगाव बायपास वाहतुकीसाठी सुरू करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पुढील नियोजन केले आहे. १५ फेब्रुवारी पर्यंत बायपास सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Mangaon Bypass Work
Mumbai Police: ३६ वर्षांपासून फरार आरोपी गुजरातमधून जेरबंद

कोकण रेल्वे मार्गावरील गर्डर बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित उड्डाणपुलाचे काम वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. माणगाव बायपासचे काम सुरू झाल्यानंतर इंदापूर बायपासच्या कामालाही सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प व्यवस्थापक शर्माजी यांनी दिली आहे.

१७ वर्षांची प्रतीक्षा, वाहतूककोंडीचा विळखा

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम विविध कारणांमुळे रखडले आहे. या महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर परिसरातील बायपासचे काम अपूर्ण राहिल्याने स्थानिक नागरिकांसह कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. माणगाव शहरातून जाणाऱ्या वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे बाजारपेठ, मुख्य रस्ते आणि महत्त्वाच्या चौकांमध्ये वारंवार वाहतूक कोंडी होते.

माणगाव शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडते. रुग्णवाहिका, शालेय वाहने, स्थानिक प्रवासी आणि व्यापाऱ्यांनाही या कोंडीचा फटका बसतो. त्यामुळे माणगाव बायपास लवकरात लवकर पूर्ण व्हावा, ही नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.

रेल्वे प्रवाशांनाही कोणताही त्रास होणार नाही

कोकण रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे काम करताना रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. दुसऱ्या मार्गिकेवरील गर्डर बसविण्यासाठी पहाटे ४.३० ते सकाळी ९.३० या वेळेची निवड करण्यात आली आहे. या वेळेत संबंधित मार्गावर रेल्वे गाड्यांची ये-जा होणार नसल्याने गर्डर बसविण्याचे काम सुरक्षितपणे पूर्ण करता येणार आहे. रेल्वेच्या वेळापत्रकात कोणताही बदल न करता नियोजनबद्ध पद्धतीने हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

माणगावकरांना वाहतूककोंडीतून दिलासा?

माणगाव बायपास सुरू झाल्यास शहरातील अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात बाहेरून वळविता येईल. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दी कमी होऊन अपघातांचा धोका कमी होण्यास मदत होईल. स्थानिक नागरिक, विद्यार्थी, व्यापारी, रुग्ण आणि प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचेल. शहराच्या विकासालाही नवी चालना मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.