

ठाणेः अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हे थोर विचारवंत आहेत. एस.एम जोशी , प्रा.मधु दंडवते यांच्या विचारसणीचे ते नेते आहेत. त्यांच्यावर आरोप होणे हे गैर आहे. असे टोले लगावत या प्रकरणाची एनआय किंवा सीबीआयकडून चौकशी करा, अशी भुमीका खासदार सुनील तटकरे यांनी मांडली. तर मी केलेल्या आरोपाची कुठलीही चौकशी करा, मी पुरावे देण्यास तयार असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.
महेंद्र दळवींचा लाखो रुपये मोजतानाच व्हिडीओ अंबादास दानवेंनी पोस्ट केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ देणारे हे रायगडचे मोठे नेते आहेत. असे सांगत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आमदार दळवीच्या कार्यप्रणालीवर खोचक सवाल उपस्थीत करत ते विचारवंत असल्याचा टोला लगावला.
दरम्यान आमदार महेंद्र दळवी यांनी माझी आणि माझ्या पक्षाची बदनामी करण्यासाठी हा खोटा व्हिडीओ दानवे यांनी या विषयावर बोलताना एनआय, सीबीआय, सीआयडी या कुठल्याही यंत्रणेबाबत या प्रकरणाची चौकशी करा मी उत्तर द्यायला तयार असल्याचे म्हंटले आहे.
हिवाळी अधिवेशनात व्हायरल कॅश व्हिडिओ प्रकरणाने वातावरण चांगलेच तापले आहे. अंबादास दानवेंनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर देत महेंद्र दळवींनी चॅलेंज केले आहे. तसेच महेंद्र दळवी यांनी आता अंबादास दानवे यांना नोटीस बजावली आहे. माझा सहभाग असल्यास आमदारकीचा राजीनामा देईन, असे दळवींनी म्हटले.
आमदार महेंद्र दळवी यांनी त्यांच्यावर अंबादास दानवे यांनी केलेल्या मॉर्फ व्हिडीओ आरोपांना तीव्र आक्षेप घेतला आहे. दानवेंनी नोटांची गड्डी दाखवणाऱ्या व्यक्तीचा फोटो मॉर्फ करून पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप दळवींनी केला आहे. या संदर्भात, दळवी यांनी अंबादास दानवे यांना खुले आव्हान दिले आहे की, जर त्यांच्याकडे या आरोपांचे कोणतेही खरे पुरावे असतील तर ते जनतेसमोर सादर करावेत.
दळवी यांनी ठामपणे सांगितले की, जर या आरोपांमध्ये अंशतः सत्यता जरी आढळली तरी ते आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहेत.या प्रकरणावरून रायगडचे राजकारण आणखीच तापले आहे. शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी हा आरोपांचा सिलसिला आणखीच वाढला असून रायगडच्या राजकारणात आणखीनच धार आली आहे.या साऱ्या गोष्टींची सुख्मंत्र्यंनी चौकशी करुन त्याचा तपशिलवार अहवाल लगेच विधीमंडळात ठेवावा, अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना आज केली आहे.
योग्य खुलासा न झाल्यास मानहानीचा गुन्हा दाखल करणार
महेंद्र दळवींच्या म्हणण्यानुसार, दानवेंनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून मॉर्फ केलेला फोटो वापरून राजकीय सनसनाटी निर्माण करण्याचा आणि बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधी पक्षाला अधिवेशनादरम्यान महाराष्ट्रासमोरील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी अशा कृतींमध्ये व्यस्त असल्याचे दळवींनी म्हटले. महेंद्र दळवी यांनी अंबादास दानवे यांना बदनामी केल्याप्रकरणी आठ दिवसांची मानहानीची नोटीस बजावली असून, योग्य खुलासा न झाल्यास मानहानीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.