Political News: झाले गेले विसरुन रायगडात पुन्हा एकदिलाने काम करु; सुनील तटकरे यांची महायुतीच्या मित्रपक्षांना ग्वाही

जमिनीवरती पाय ठेवतच अशा पद्धतीने आपण काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करु असे, खा. सुनील तटकरे यांनी जाहीर केले.
Political News
Political NewsPudhari
Published on
Updated on

रोहे: महायुती म्हणून आपण काम करताना आघाडीचा धर्म पालन करत आपल्य पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विचार सोबत घेत त्यांच्याही अस्तित्वाला कुठेही कमीपणा येणार नाही याचे भान ठेवत मित्रपक्षांच्या सोबतीने उद्या भवितव्याची वाटचाल त्या ठिकाणी करायची आहे. जमिनीवरती पाय ठेवतच अशा पद्धतीने आपण काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करु असे, खा. सुनील तटकरे यांनी जाहीर केले.

यावेळी तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार मानले. सुतारवाडी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

Political News
Drowning Accident: जासईत तलावात बुडून तीन चिमुरड्यांचा मृत्यू

यावेळी मंत्री आदिती तटकरे, नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे, जि. प.उपाध्यक्ष मधुकर पाटील, प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, अमित नाईक, जिल्हाध्यक्षा उमा मुंढे, संतोष बैलमारे, हनुमंत जगताप, मंगेश दांडेकर, नंदकुमार म्हात्रे, सभापती विजया पाशिलकर, उपसभापती संजय मांडलुस्कर, नगराध्यक्ष वनश्री शेडगे, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, गट नेते महेंद्र गुजर, तालुका अध्यक्ष विनोद पाशिलकर, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, तालुका कार्याध्यक्ष समीर शेडगे, निधी जाधव, महेश कोलाटकर, मयुर दिवेकर, शिवराम शिंदे आदी उपस्थित होते.

उपस्थितांसमोर बोलताना तटकरे यांनी आपल्या सर्वांची आयुष्यभराची पुण्याई, मिळालेली साथ यांच्या बळावरती अभुतपूर्व यश संपादित करू शकलो. मागील काळात प्रचंड पद्धतीने अपमानास्पद पराकोटीची टीका, कधी खालच्या पातळीवरची टीका, कधी जे घडलं नाही त्या बाबत वावडया उठवण्याचे काम, इतक्या प्रचंड प्रमाणात केले त्याच्यामुळे एका बाजूला मनस्ताप होत होता.

परंतु निवडणुकीनंतर अनेक कंगोरे निर्माण होत गेले. आयुष्यभर नेमकं काय कमावलं, किती वेळा पदावर गेलो, किती वेळा मंत्री झालो. तरी पण आयुष्यभरामध्ये अहंकार मनाला शिवून घेतला नसल्याचे नमूद केले.

Political News
Gas Cylinder Shortage: गॅस सिलिंडर टंचाईचा ग्रामीण भागात परिणाम; महिलांचा मोर्चा चुलीकडे

आ.अनिकेत तटकरे यांनी मी अंतकरणापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणे, नारायणराव राणे, ना.भरतशेठ गोगावले, सर्व आमदार खासदार, या सर्वांचे आभार व्यक्त केले.

त्यांनी या पूर्ण प्रक्रियेमध्ये भरभक्कमपणाने साथ त्या ठिकाणी दिली.सर्वांची साथ मला लाभली, नेते मंडळी व कार्यकर्ते यांनी सहकार्य केले त्यांचे मी आभार मानतो. आमदारकीच्या पहिल्या कालखंडानंतर दुसरा कालखंडात आपल्या सर्वांना अभिप्रेत असलेले काम मी करणार आहे.

आता लवकरच खारघर ते सिंधुदुर्ग पर्यंत म्हणजे गोव्याच्या टोकापर्यंत सर्व कार्यकर्त्यांच्या भेटी गाटी घेणार असल्याचे यावेळी आवर्जून अनिकेत तटकरे यांनी सांगितले. यावेळी तटकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी कोकणातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुतारवाडी येथे दाखल झाले होते.

विकासाच्या माध्यमातून न्याय देणार

आपल्याकडे १० टक्क्यांच्या आसपास संख्याबळ असताना महायुती व महाविकास आघाडी ही लढत होईल असं वाटलं. निवडणुकीची तयारी चालु होती. राजकारण बदलत होतं अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सकाळी हालचाली झाल्या आणि आपण बिनविरोध यश संपादन करू शकलो हा महाराष्ट्रात स्पष्ट संदेश देण्यात यशस्वी झालो.

काल काय झालं त्याच्यापेक्षा सारे विसरून जाऊ. उद्याचा उषकाल उद्याचा भविष्य एका बाजूला पक्ष म्हणून पक्षाचा संघटन उभं करणार. तिन्ही जिल्ह्यामध्ये पक्षाला मानणाऱ्या मतदारांना वेगवेगळ्या विकासाच्या कामाच्या माध्यमातून अधिक न्याय त्या ठिकाणी देणार. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना राबविणार असल्याचे खा. सुनील तटकरे यांनी सांगीतले.

ही पहिलीच निवडणूक असेल ती पाच दिवसात चालू झाली आणि संपली. खा. सुनील तटकरे यांच्यावरील विश्वास आम्हाला या निवडणुकीत पाहायला मिळाला. पहिल्यांदाच अपेक्षेपलीकडील यश मिळाले. अनिकेत तटकरे हे बिनविरोध निवडून आले. खा. सुनील तटकरे यांचे चमत्कारिक नेतृत्व असल्याचे या निवडणुकीत दिसून आले.

ना.आदिती तटकरे, मंत्री,महिला बालकल्याण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news