Agricultural damage : शिवारातील उभ्या पिकांना धोका ?

खांब विभागात हजारो एकरात भात लागवड ,बळीराजा संकटात
Agricultural damage
शिवारातील उभ्या पिकांना धोका ?pudhari photo
Published on
Updated on

खांब : ईडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे,ही म्हण आता इतिहास जमा झाली आहे.तर एकेकाली रायगडची भाताचे कोठार म्हणून इतिहासात ओळख आहे, मात्र त्याच रायगडातील बळीराजा शेतकरी सततच्या पावसामुळे पिकाला आलेल्या धानाची नुकसानी रोहा तालुक्यातील खांब देवकान्हे विभागातील शेतकर्‍यांची होत असल्याने तो हवालदिल होत चिंतेत पडला आहे.

मोसमी पावसामुळे पाणी साचून पिकाच्या मुळांना लागल्याने सडले, तर काही शेतकर्‍यांनी कापणी केलेली पिके जमिनीवर लोळत वाहून त्या धानाची नासाडी झाली आहे. अनेक ठिकाणी पूर्णपणे कुजून शेतातच राहिली त्याचे तत्काल पंचनामे देखील वरीष्ठ पातळीवरून करण्यात आले.

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना पंचनामे केल्याचा प्रशासनानी दिलासा दिला मात्र त्याची नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही.तरी देखील बळीराजा या मोठ्या संकटाला झुंझ देत पुन्हा खरिपाच्या पेरणीसाठी उसनवारी करून सज्ज होऊन खरिपाची पेरणी केली तद्नंतर लागवड केली भरमसाठ पावसात काहींची लागवडीस आलेले पेरणे रोप वाहून गेली ज्यांची वाचली त्यांनी लागवड केली.

पाऊस जरी भात पिकांना समाधानकारक पडला असला तरी आताच्या घडीला काही धान पिकला पीक देखील समाधानकारक आहे.त्याची कापणी येत्या आठ ते दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र वरुणराजाची विश्रांती मिळत नसल्याने तसेच तो सतत बरसत असल्याने शेतात पिकाला आलेले धान अथवा बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याच्या मार्गावर आहे.

Agricultural damage
Raigad Fort landslides : किल्ले रायगड पायरी मार्गावरील दगड पडण्याचे प्रकार सुरूच

खांब - देवकान्हे विभागासह तालुक्यातील शेतकरी बळीराजा मोठा चिंतेत सापडला आहे. शेतकर्‍यांची चिंता वाढल्याचे दिसत असून धान पिकांसोबत फळ बागायत देखील तसेच नाचणी वरी या पिकांना या पावसाचा जोरदार फटका बसत आहे. काही ठीक ठिकाणी जंगल भागातून रानटी डुकरांचा आणि वानरांचा हैदोस सुरू झाला आहे.

मुसळधार पावसामुळे तयार झालेले तसेच कापणीला आलेली भातपिके जमिनीवर आडवी पडलीत. पिकांचे आणखी मोठ्या नुकसान होत आहे. जुरांशिवाय कापणी करणे कठीण होते. त्यात पिकांची नासाडी झाल्यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसतो, कारण त्यांना उत्पादनाचा खर्चही निघत नाही. पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना आर्थिक मदत द्यावी.

डॉ मंगेश सानप, सदस्य कुणबी समाजोन्नती संघ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news