Mahad | महाड तालुक्यामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
A minor girl was raped in Mahad taluka
महाड तालुक्यामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार Pudhari File Photo
Published on
Updated on

महाड : महाराष्ट्रातील बदलापूर घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा महाड तालुक्यामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. लग्नाचे आमिष दाखवून शाळेत शिकणार्‍या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने वारंवार अत्याचार केले आहेत.

याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहिती असून देखील आरोपी याने मी तुझ्याशी लग्न करतो असे सांगून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या घटनेने संपूर्ण तालुका हादरला असून याप्रकरणी महाड तालुका पोलीस ठाणे येथे संबंधित आरोपी विरोधात बलात्कार तसेच पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खेडेकर या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news