Mahad News | महाडच्या युवकांचा गिर्यारोहणाकडे वाढतोय कल

दोन गिर्यारोहकांनी बेसिक माउंटनिंग कोर्स केला पूर्ण! विविध मोहिमेत सहभाग
Mahad News
महाडच्या युवकांचा गिर्यारोहणाकडे वाढतोय कलMahad News | The youth of Mahad is increasing towards mountain climbing
Published on
Updated on
महाड ः श्रीकृष्ण बाळ

महाडच्या युवकांचा गिर्यारोहणाकडे कल वाढत चालला असून गिर्यारोहण क्षेत्रात महाडमध्ये गेल्या काही वर्षापासून कार्यरत असलेल्या संकेत शिंदे व रोशन भोपी या दोन तरुणांनी गिर्यारोहण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण व मानाच्या समजल्या जाणार्‍या बेसिक माउंटेन कोर्स या एक महिन्याच्या कालावधीचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्याची माहिती डॉ. राहुल वारंगे यांनी दिली आहे.

सह्याद्री गिरी भ्रमण संस्थेच्या वतीने गेल्या काही दशकांपासून महाड मधील शालेय विद्यार्थी महाविद्यालय विद्यार्थी तसेच जेष्ठ नागरिकांसाठी गिर्यारोहणाचे अनेक ट्रेक आयोजित करण्यात आले होते. महाडमधील आपल्या दोन सहकार्‍यांच्या या प्रशिक्षणाच्या कार्यपूर्ततेबाबत वारंगे यांनी समाधान व्यक्त केले. नव्याने समाविष्ट होणार्‍या तरुण वर्गासाठी शास्त्रीय पद्धतीने हिमालयीन गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देणार्‍या शासन मान्य असलेल्या संस्थांमधून बेसिक माउंटन कोर्स करणे बंधनकारक असल्याचे नमूद केले.

या कोर्स यशस्वीते नंतर बेसिक अ‍ॅडव्हान्स व सर्च अँड रेस्क्यू अशा अन्य दोन पद्धतीच्या गिर्यारोहणाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणार्‍या विविध संस्था शासन मान्य पद्धतीने गेल्या अनेक दशकांपासून उत्तर भारतामध्ये कार्यरत आहेत.यामध्ये नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनिंग उत्तरकाशी उत्तराखंड ,हिमालयीन माउंटन इन्स्टिट्यूट दार्जिलिंग, अटल बिहारी माउंटनिंग इन्स्टिट्यूट मनाली, जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनिंग जम्मू कश्मीर ,गंगटोक सिक्कीम निमास ,दिरांग अरुणाचल प्रदेश या संस्थांचा समावेश आहे.

संकेत शिंदे व रोशन भोपी या दोन तरुणांनी मागील महिन्याभरात हा कोर्स पूर्ण करून नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनिंग अँड अलाईट स्पोर्ट्स या ठिकाणी एक महिन्याच्या गिर्यारोहणाच्या खडतर प्रशिक्षणाचे यशस्वीरित्या पूर्तता केल्याची माहिती देतानाच येत्या दोन दिवसात त्यांचे महाडला आगमन होईल,असे ते म्हणाले. या प्रशिक्षणामध्ये रॉक ड्रॉप अतिउंची वरील बेस कॅम्प पर्यंत ट्रेक त्यानंतर आईस क्राफ्ट, स्नो क्राफ्ट, याबरोबर हिमालयातील हवामान मॅप रिडिंग, नैसर्गिक तथा कृत्रिम गिर्यारोहणाचे तंत्र, अति उंचीवरील कॅपिन यांचा समावेश असल्याची माहिती दिली.

मागील सुमारे दोन दशकांच्या कार्यकाळात महाड परिसरातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी शालेय विद्यार्थी तसेच जेष्ठ नागरिकांना महाड सह महाड तालुक्यात शेजारील असलेल्या विविध किल्ल्यांवर तसेच दुर्गम भागामध्ये ट्रेक साठी नेण्याचा यशस्वी प्रयोग सुरू आहे.

महाडमध्ये 15 गिर्यारोहक

महाडमध्ये आज पावतो अशा पद्धतीचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतलेले बेसिक प्रशिक्षणचे 10 बेसिक अ‍ॅव्हान्स चे 5 ज्यामध्ये स्वतः डॉक्टर राहुल वारंगे यांच्या सुविद्य पत्नी सौं शलाका वारंगे, अमोल वारंगे, नेहा शेठ ,भूषण शेठ ,तसेच चिंतन वैष्णव, चिराग शेठ, मोहन वडके व धनंजय दाते यांचा समावेश आहे. प्रशिक्षणाबरोबर मेथोड ऑफ इन्स्ट्रक्शन्स बाबतही महत्त्वपूर्ण प्रशिक्षण या संस्थांमधून दिले जात असल्याची माहिती वारंगे यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news