

महाड: महाड नगर परिषदेच्या सुमारे साठ वर्षांपूर्वी शहराजवळील पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कुर्ला येथे उभारण्यात आलेल्या धरण परिसरात अज्ञात इसमांंकडून करण्यात आलेल्या अघोरी कृत्याबाबत महाड नगर परिषद प्रशासनाने महाड तालुका पोलीस ठाण्यात देखील तक्रार दाखल केली असून संबंधित विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्या नावाने महाड तालुका पोलीस ठाण्यात हे पत्र देण्यात आले आहे. या धरणातून महाड शहरातील नागरिकांना गेल्या अनेक दशकांपासून पाणीपुरवठा केला जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तरी झालेल्या अघोरीस विद्या संदर्भातील घटनेची चौकशी करून अज्ञात इस्मान विरोधात कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.