Mahad Accident | महाड - दापोली राज्य मार्गावर अपघातांना सुरुवात! रस्त्‍याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह!

फौजी अंबवडे- मुंबई एसटी बस घसरली सुदैवाने जीवित हानी टळली
Mahad Accident | महाड - दापोली राज्य मार्गावर अपघातांना सुरुवात! रस्त्‍याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह!
Published on
Updated on

महाड : महाड दापोली राज्य मार्गावर मागील वर्षी शिरगाव पासून आंग्रेकोंड पर्यंत अपघाताची मालिका मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात चालू झाली होती, त्याच पद्धतीने यावर्षी देखील याच रस्त्यावर वाहने घसरून अपघात होण्याची मालिका चालू झाली आहे. आज फौजी अंबवडे मुंबई एसटी बस रस्त्यावरून घसरून अपघात झाला सुदैवाने जीवित हानी टळली असली तरी रस्त्याच्या गुणवत्तेबाबत पुन्हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महाड दापोली राज्य मार्गावर मागील वर्षी मे महिन्यात पावसाळा सुरू झाल्यावर रस्त्यावर वाहने घसरून अपघात झाले होते त्याच पद्धतीने चालू वर्षी पावसाळा उशिरा चालू झाला त्यामुळे पावसाळा चालू होतात या मार्गावर वाहने घसरण्याचे प्रकार चालू झाले आहेत.

मुंबई सेंट्रल आगाराची फौजी अंबवडे मुंबई एसटी बस महाड कडे येत असताना दुपारी तीनच्या सुमारास कुरले गावाजवळ रस्त्यावरील साईड पट्टीवर घसरून बस रस्त्याच्या बाजूला गेली. सुदैवाने या बसमधून पाच प्रवासी महाडच्या दिशेने प्रवास करत होते सुदैवाने कोणाला काही दुखापत झाली नसली तरी या रस्त्याच्या गुणवत्तेबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news