Mahad fire news
महाड : महाड शहरातील चवदार तळे परिसरात मध्यरात्री उशिरा एका आईस्क्रीम आणि डेअरी उत्पादने विक्री करणाऱ्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती नगरपरिषद अग्निशमन दलाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
रात्री सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच महाड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. त्यामुळे ही आग परिसरातील इतर दुकानांपर्यंत पसरण्याची मोठी दुर्घटना टळली.
या आगीचे प्राथमिक कारण 'शॉर्ट सर्किट' असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेच्या अनुषंगाने वीज वितरण कंपनीचे अधिकारी, नगरपरिषद आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी यांच्याकडून रविवारी सकाळी घटनास्थळाची पाहणी केली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.