

सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदारांनी सातत्याने सभागृहात विषय मांडून देखील स्वतंत्र महामंडळ स्थापन होत नसल्यामुळे सरसकट लिंगायत समाजाला ’जगतज्योती महात्मा बसवेश्वर लिंगायत आर्थिक विकास महामंडळाचा’ लाभ मिळत नाही. परिणामी महाराष्ट्रातील लिंगायत समाजात सरकार विरोधी प्रचंड असंतोष पसरला आहे. त्यामुळे सकल लिंगायत समाजाने छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी येथे एकत्र येत लिंगायत समाजच्या वतीने शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी उपस्थित लिंगायत समाजाचे महेश कोटीवाले, सिद्धाराम शिलवंत, नीलकंठ बिजलगावकर, आनंद गवी, राम लिंगया, सुनील पाटील, अशोक बिराजदार, शंकर संकपाळ, शशी बबलाद, चंद्रशेखर स्वामी , महांतेश बुक्का, स्मिता दमामे, सुवर्णा भद्रे, सुरेखा कोटीवाले, ऐश्वर्या बद्रे, गीता शिलवंत, बिराण्णा बिराजदार, रमेश बैरामडगी, सुनील स्वामी तसेच लिंगायत समाजातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक समाजाचा सामाजिक,आर्थिक, सांस्कृतिक विकास व्हावा यासाठी स्वतंत्र महामंडळे स्थापन करून मोठ्या प्रमाणात निधी दिला गेला आहे. मात्र लिंगायत समाजावर अन्याय करत महामंडळाचा लाभ घेण्यापासून या समाजाला वंचित ठेवण्यात आले आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विकास महामंडळ अंतर्गत जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) म्हणून स्थापन करण्यात आली होती. परंतु त्याचा लाभ लिंगायत समाजातील ज्या जाती ओबीसी प्रवर्गात येतात अशा केवळ 5 टक्के लोकांना होतो. ओबीसी महामंडळ अंतर्गत स्थापन केलेल्या या महामंडळाचा लाभ फक्त लिंगायत समाजातील ओबीसी प्रवर्गात येणार्या जातींना होतो.