

महाड : महाड तालुक्यातील करंजाडी येथील मांडवकर कोंड च्या मुख्य रस्त्या लगत परिसरात बिबट्या वावरताना दिसुन आला. याचा सतर्क नागरिकाने मोबाईल मध्ये व्हिडियो चित्रित केला. बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्ग प्रचंड धास्तावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार बिबट्याने रात्री बिजघर गावचे उपसरपंच यांचा कुत्रा घेऊन गेल्याची माहिती प्राप्त झाली आजे या विषयाची माहिती मिळताच विभागातील समाजसेवक, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे रायगड जिल्हा समन्व्यक,शिरगाव सरपंच श्री सोमनाथ ओझर्डे यांनी वनविभाग अधिकारी येई पर्यंत बॅटरी ने लक्ष ठेवले,त्यामुळे बाकीचा अनर्थ टळला. त्यानंतर वन विभाग अधिकार्यांनी घटनास्थळी जाऊन सावधानतेसाठी बार वाजवले.
लहान मुले व पाळीव प्राणी घरातच ठेवा,गुरांच्या गोठ्याचे दरवाजे पूर्णपणे बंद ठेवा,रात्री अनावश्यक बाहेर पडणे टाळा तसेच कोणालाही बिबट्या दिसल्यास त्वरित स्थानिक वनविभागास कळवावे असे अधिकार्यांनी सांगितले. वनविभाने सदर बिबट्यांना लवकर जेरबंद करावे अशी मागणी बिजघर सरपंच सौ. मिनाक्षी ताई खोपटकर यांनी केली आहे. महाड तालुक्यातील सह पोलादपूर तालुक्यातील डोंगर भागात अनेक वेळा बिबट्याने दर्शन दिली आहे तीन वर्षे पूर्वी पनवेल च्या ग्रामीण भागात बिबट्याने दर्शन दिले होते यानंतर अनेकदा बिबट्याने महाड व पोलादपूर तालुक्यात दर्शन दिले आहे.
नुकताच रायगड विभागातील नांदगाव बौद्धवाडी येथील विजय चिंतामण जाधव यांच्या घराशेजारील वाड्यातून चार बकर्या या बिबट्याने फर्स्ट केल्याची माहिती प्राप्त झाली होती. महाड तालुक्याच्या विविध भागात गेल्या वर्षभरात किमान दहा ते बारा घटना घडल्यानंतर सुद्धा वनखात्याकडून या संदर्भात आवश्यक असलेली कार्यवाही होत नसल्याने शेतकरी वर्गातून तसेच ग्रामीण भागातून ग्रामस्थांकडून तीव्र नाराजीयुक्त संताप व्यक्त होत आहे.
या बिबट्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता त्या माणसाला सुद्धा धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने वन खात्याने या संदर्भात तातडीने कारवाई करून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.