

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील नागाव गावातील वाळंज पाराेडा खालच्या आळीत सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बिबट्याचा वावर आढळून आला. बिबट्याने सकाळी दोन तर दुपारी तीन जणांवर हल्ला केला. यामुळे संपूर्ण नागाव गावात दहशतीचे वातावरण पसरले. वाळंज पाराेडा परिसरात मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले. बिबट्याला पकडण्यासाठी अलिबाग वनविभागाचे कर्मचारी यांच्यासह राेहा येथील वनविभागाच्या रेस्क्यू टिम दाखल झाल्या. मात्र बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षित मनुष्यबळ तसेच साहित्याचा अभाव यामुळे त्यांच्या मर्यादा उघड झाल्या.
परिणामी बिबट्याला पकडण्यासाठी पुणे येथील रेस्क्यू टिमला पाचारण करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू होते. यामुळे नागाव परिसराला अघोषित कर्फ्यु असल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते परिसरात जमलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.
अलिबाग जवळच्या नागाव मधील वाळंज पाराेडा खालच्या आळीत भर वस्तीत बिबळ्याने येवून आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अमीत वतर्क आणि प्रसाद सुतार या दाेघांवर हल्ला केला. यामध्ये अमीत वर्तक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर प्रसाद सुतार अल्प प्रमाणात जखमी झाले.,त्यांचे कपडे बिबट्याने फाडले.
बिबट्या दिसल्यानंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थ परिसरात दाखल झाले. काहींनी वनविभाग तसेच पोलिस प्रशासनासोबत संपर्क साधून बिबट्या असल्याची माहिती यंत्रणेला दिली. थोड्याच वेळाने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तर १२ वाजण्याच्या सुमारास वन विभागाचे कर्मचारी व १२.४५ ते १ वाजण्याच्या दरम्यान राेहा येथील वनविभागाच्या रेस्क्यू टिम दाखल झाल्या. मात्र बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षित मनुष्यबळ तसेच साहित्याचा अभाव यामुळे त्यांच्या मर्यादा उघड झाल्या. परिणामी बिबट्याला पकडण्यासाठी पुणे येथील रेस्क्यू टिमला पाचारण करण्यात आले. तेव्हापर्यंत जिल्ह्यातील वनविभाग व रोहा वनविभाग रेस्क्यू टीम बिबट्याच्या हालचालींकडे लक्ष ठेवून होत्या.
दरम्यान दुपारी २ नंतर बिबट्याने पुन्हा आक्रमक रूप धारण केलं. यावेळी त्याने पळून जाण्याचं प्रयत्न केला. त्याने यावेळी पुन्हा तीन जणांवर हल्ला केला. पुणे येथील रेस्क्यू टीम ४ वाजण्याच्या सुमारास दाखल झाली. त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेत. बिबट्याला प्रयत्न सुरू केले आहेत.
पर्यटक हॉटेलमध्ये
नागावमध्ये बिबट्या आल्याची खबर मिळताच सर्व हॉटेल, कॉटेज मालकांनी आपल्याकडे आलेल्या पर्यटकांना घटनेची माहिती देत, त्यांना बाहेर न पडण्याचे आवाहन केले. तसे शच गावात बिबट्या असल्याने गावातील सर्व शाळा सोडण्यात आल्या होत्या.नागावमध्ये बिबट्या आल्याने वाळंज पाराेडा परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. यामुळे परिसराला अघोषित कर्फ्युचे स्वरूप आले होते. पोलीस विभागामार्फत येथे जमा झालेल्या नागरिकांना आपल्याला घरी जाण्याचे आवाहन सातत्याने करण्यात येत होते.
घरे बंद, ग्रामस्थांचा उद्रेक
वाळंज पाराेडा खालच्या आळीत बिबट्या आल्याने येथील नागरिकांनी आपल्या घरांचे दरवाजे तसेच खिडक्या बंद केल्या होत्या. घाटातील व्यक्ती घरच्या छतावर जाऊन बिबट्या कुठे दिसतोय याचा अंदाज घेत असल्याचे चित्र दिसून आले. सायंकाळी उशिरा बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न सुरू असताना बिबट्या अचानक परिसरातील बागेच्या कुंपणावरून उडी मारून पदर झाला. यांनतर बिबट्याचा ठावठिकाणा समजून आला नाही. यामुळे ग्रामस्थ संतापले. त्यांनी वनविभाग व पोलिस प्रशासन यांना जाब विचारला. तुम्ही अपयशी ठरळात. बिबट्याने आमच्यावर हल्ला केल्यास जब्बदार कोण अशा प्रश्नांचा भडिमार त्यांनी केला. पोलिस कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून ग्रामस्थांची समजूत काढली, यांनतर वातावरण शांत झाले.