रायगड किल्ल्याच्या महादरवाजा नजिक दरड कोसळली

पायरी मार्ग बंद असल्याने दुर्घटना टळली
Landslide near Raigad Fort
रायगड किल्ल्याच्या महादरवाजा नजिक दरड कोसळली आहे. Pudhari
इलियास ढोकले

नाते : हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरील महादरवाजाच्या अलीकडील भागामध्ये आज दुपारनंतर दरड कोसळली आहे. जिल्हा प्रशासनाने आधीच पायरी मार्गावरून किल्ल्यावर जाण्यास बंदी केल्याने संभाव्य दुर्घटना टळली आङे.

स्थानिका ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार महादरवाजाच्या अलीकडील सपाटीकरण असलेल्या भागामध्ये ही दरड कोसळली. ही दरड कोसळून रस्ता बंद झालेला आहे, ही दरड हटवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रायगड प्राधिकरणाच्या वतीने सुरू करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. बुर्ले यांनी सांगितले.

वेधशाळेकडून अलर्ट

येत चार दिवस रायगड जिल्ह्यात संततधार पावसाची शक्यता असून वेधशाळेने ऑरेंज अलर्ट दिला असल्याच्या जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले. त्यानुसार किल्ल्याचा पायरी मार्ग बंद ठेवण्यात आला आहे.

तसेच महाड पोलादपूर मधील धबधबे आणि इतर पर्यटन स्थळांवर यापूर्वीच बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आपत्तीनिवारण कायदा 2005 नुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news