Land fraud : बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीची विक्री

पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल
Raigad Crime News
Land fraud : बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीची विक्रीFile Photo
Published on
Updated on

पनवेल ः बनावट कागदपत्रांच्या आधारे दुसरी व्यक्ती उभी करून बनावट सही केली आणि खरेदीखत बनवून जमीन स्वतःच्या नावे करून तिची विक्री केल्याप्रकरणी प्रभाकर बंडू नाईक (डेरवली) आणि अंबावी रणछोड पटेल (रा. सेक्टर 17 वाशी) यांच्या विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संजय महागावकर हे गुजरात येथे राहत असून त्यांची व आईच्या नावे वाघाची वाडी आणि धोदाणी येथे जमीन आहे. 2023 मध्ये त्यांचा मुलगा आणि पत्नी हे घरपट्टी भरण्यासाठी गेले असता दोन्ही मिळकती त्यांच्या नावावर नसून त्या दुसर्‍याच्या नावावर झालेल्या असल्याचे समजले.

त्यांनी या संदर्भात कागदपत्रे माहिती घेतली असता त्यांची आई नीला महागावकर ही 2008 मध्ये मयत असताना सुद्धा प्रभाकर नाईक यांनी तिच्या जागी दुसरी व्यक्ती उभी केली आणि त्यांच्या आईच्या खोट्या सह्या करून वाघाची वाडी या मिळकतीचे खोटे व बनावट खरेदीखत तयार करून सदरची मिळकत स्वतःचे नावे केली आणि आईच्या नावाचे भारत निवडणूक आयोगाचे खोटे ओळखपत्र तयार केले.

या खरेदी खतात अंबावी रणछोड पटेल यांनी साक्षीदार म्हणून सही केली. 2015 रोजीच्या खरेदी खतात दोघांनी दुसरा साक्षीदार म्हणून संजय महागावकर यांना दाखवलेले आहे. मात्र खरेदीखत करताना ते उपस्थित नव्हते. त्याचप्रमाणे दोघांनी येथील मिळकतीच्या जागी संजय महागावकर त्यांच्या जागी दुसरी व्यक्ती उभी करून खोट्या सह्या केल्या आणि सदरची मिळकत अंबावी पटेल यांच्या नावे केली.

या खरेदी खताचा साक्षीदार म्हणून प्रभाकर नाईक यांनी सही केली आहे आणि त्यानंतर ती मिळकत त्याने दुसर्‍या व्यक्तीला विकली आहे. फसवणूक प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news